शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

जिंदालच्या कार्यक्रमाला स्थानिकांचा विरोध

By admin | Updated: September 23, 2015 03:50 IST

मे. जेएसडब्लु (जिंदाल) इन्फ्रास्ट्रक्चर लि. च्या अर्थसहाय्याने स्त्रि-पुरूष समानतेचा कार्यक्रम मुरबे ग्रामपंचायतीने मंगळवारी आयोजित केल्याचे समजल्यानंतर

पालघर : मे. जेएसडब्लु (जिंदाल) इन्फ्रास्ट्रक्चर लि. च्या अर्थसहाय्याने स्त्रि-पुरूष समानतेचा कार्यक्रम मुरबे ग्रामपंचायतीने मंगळवारी आयोजित केल्याचे समजल्यानंतर स्थानिक मच्छीमार बागायतदारांना उद्ध्वस्त करणाऱ्या जिंदाल कंपनीचे अर्थसहाय्य घेऊ नका व उद्ध्वस्त होऊ नका अशा घोषणा देत स्थानिकांनी हा कार्यक्रम बंद पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र सातपाटी सागरी पोलीसांनी हा प्रयत्न हाणुन पाडला.पालघर तालुक्यात जेएसडब्ल्यु इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या मौजे नांदगाव-आलेवाडी येथे बारामाही बंदर विकास प्रकल्प प्रस्तावित असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मालाची हाताळणी व वाहतुक तसेच इतर औद्योगिक प्रकल्पाच्या मालाची वाहतुकीचा १ हजार १७५ कोटीच्या गुंतवणूकीचा प्रोजेक्ट होणार आहे. परंतु या बंदरामुळे स्थानिक मच्छीमारी व्यवसाय उध्वस्त होणार असून स्थानिकांच्या बागायती नष्ट होऊन प्रदुषणाचा मोठा फटका येथील लोकांना बसणार असल्याने या बंदर उभारणीला सर्व स्तरातुन विरोध दर्शविण्यात आला होता. बोईसर येथे आलेल्या जनसुनवाईमध्येही हजारो स्थानिकांनी आपली उपस्थिती दाखवीत आपला लेखी विरोध नोंदविला होता तर केंद्र शासनाच्या अणुऊर्जा विभागानेही आलेवाडी बंदर हे तारापुर अणुऊर्जा प्रकल्पापासून हवाई अंतराने खुप जवळ असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने हा प्रकल्प रद्द करावा अशी शिफारस शासनाने केली होती. १५ सप्टेंबर २०१३ रोजी ही जिंदालच्या प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध असेल तर आपण हा प्रकल्प रद्द करू असे आश्वासन जिंदाल समुहाचे संचालक सज्जन जिंदाल यांनी लेखी स्वरूपात ग्रामस्थांना दिले होते. परंतु तरीही जिंदाल समुहाकडून सिएसआर फंडाच्या नावावर मच्छीमाराना जाळी, फ्लोटस्, दिले जात असून विरोध करणाऱ्यांना विविध आमिष दाखवून त्यांची तोंडे बंद करण्याचा प्रयत्न जिंदाल व्यवस्थापनाकडून करण्यात येत असल्याची टिका स्थानिकांमधून केली जात आहे. अनेक लोकांच्या सहली, महिलांचे कार्यक्रम आखून सामाजिक उपक्रमाचे नियोजन करण्यात आम्ही कुठेही कमी पडत नसल्याचे सर्वत्र भासवले जात असल्याचेही स्थानिकांचे म्हणणे आहे. अनेक राजकीय पक्षाना निवडणुक फंडही पुरवला जात असून पडद्याआडून हे राजकीय पक्ष बंदर उभारणीला सहकार्य करीत असल्याचा आरोप नांदगावचे ग्रा. पं. सदस्य धिरज गावड यांनी यावेळी केला.मुरबे ग्रा. प. नी जिंदाल पुरस्कृत मानस एकात्मिक सामाजिक संस्था या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातुन मुरबे येथे स्त्रि पुरूष समानता या विषयावर वर्षभराचा उपक्रम हाती घेतला. आज या कार्यक्रमाला जि. प. अध्यक्ष सुरेखा थेतले, उपाध्यक्ष सचीन पाटील, सभापती विनीता कोरे, माजी राज्यमंत्री मनिषा निमकर, राजेंद्र गावित, सिईओ दिलीप शिंदे, बिडीओ डि वाय जाधव, पं. स. सदस्य जितेंद्र मेर, डॉ. हेमंत संखे इ. मान्यवर उपस्थित राहणार असताना नांदगाव ग्रा. प. च्या सरपंचा विधी मोरे, उपसरपंच शर्मिला राऊत, सदस्य धिरज गावड, ग्रामस्थ, धर्मेद्र पाटील, मनिष पाटील, मोहन राणे इ. ग्रामस्थांनी कार्यक्रम ठिकाणी उपस्थित राहुन जेएसडब्ल्यु मुरबे ग्रामपंचायतीच्या विरोधात घोषणा देऊन उपस्थित मान्यवरांचा निषेध व्यक्त केला. (वार्ताहर)