शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

रानभाज्यांतून मिळते रोगप्रतिकारक शक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 00:09 IST

कोरोना रोखण्यासाठी ठरतील गुणकारी : कोसबाड कृषी विज्ञान केंद्राचे वेबिनारद्वारे मार्गदर्शन

अनिरुद्ध पाटील।

बोर्डी : पावसाळ्यात जंगलात उगवणाऱ्या रानभाज्यांमधून मोठ्या प्रमाणात जीवनसत्त्व आणि खनिजे असल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढून कोरोनाविरु द्धच्या लढ्यात ती उपयुक्त ठरते, अशी कोसबाड कृषी विज्ञान केंद्राकडून वेबिनारद्वारे नागरिकांना माहिती देण्यात आली.

कोसबाड येथील गोखले एज्युकेशन सोसायटीचे कृषी विज्ञान केंद्र , संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालय वसई आणि ग्रामीण विकास अभ्यास मंडळ, मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने पावसाळ्यातील रानभाज्यांची उपयुक्तता या विषयावर वेबिनारचे आयोजन केले होते. त्याद्वारे रानभाज्यांचे जतन व संवर्धन करून त्यांचे बारमाही उत्पादन घेऊन व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देणे ही गरज असल्याचे प्रतिपादन केंद्राच्या शास्त्रज्ञांनी केले. तर या कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. विलास जाधव यांनी महाराष्ट्रात आढळणाºया मुख्य रानभाज्या आणि त्यांचे वनस्पतीशास्त्रीय वर्गीकरण स्पष्ट करून रानभाज्यांच्या जनजागृतीबाबत या विज्ञान केंद्राचे योगदान सांगितले. यावेळी गृह विज्ञान तज्ज्ञ रु पाली देशमुख यांनी रानभाज्यांचे आहारदृष्टया महत्त्व, प्रक्रि या आणि त्यापासून बनवण्यात येणाºया विविध पदार्थांची माहिती सादरीकरणाद्वारे दिली. शास्त्रज्ञ अशोक भोईर यांनी रानभाज्यांचे जतन व त्यांचे दर्जेदार उत्पादन कसे घ्यावे याविषयी मार्गदर्शन केले.तृणधान्य वर्गातील रानभाज्यांमध्ये क्लोरोफिल नावाचे घटकद्रव्य असते. ते पचनसंस्थेसह रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. वाकळ, रानकेळी, शेवगा, हातगा, भारंगी, शेवळ यांचे गुणधर्म सांगितले. भारंगी, बिंडा, पातेरे सारख्या भाज्यांची चव तुरट व कडू असली तरी त्यात पौष्टिक गुणधर्म अधिक असतात, अशी उपयुक्त माहिती वेबिनारमध्ये दिली. मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन विभागाचे संचालक तथा ग्रामीण विकास अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. दिलीप पाटील, संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोमनाथ विभुते यांनी वेबिनार या उपक्र माला शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले. पाचशेहून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला होता.कुपोषण निर्मूलनासाठीही रानभाज्या उपयुक्तचेन्नई येथील एम.एस. स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशनचे कार्यकारी संचालक डॉ. हरिहरन यांनी वेबिनारला संबोधित केले. कुपोषण निर्मूलनासाठी रानभाज्यांचा आहारात समावेश करावा, असे आवाहन केले.