शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

व्हॉटसअ‍ॅप सोडा - सानेकर

By admin | Updated: February 29, 2016 01:37 IST

आजकाल अनेक तरूण व्हॉट्सअ‍ॅपवरून मराठी भाषेचे गोडवे गाणारे संदेश फॉरवर्ड करत असतात. मात्र तरूणांनी केवळ व्हॉट्सअ‍ॅपवीर न होता मराठी भाषेच्या संवर्धनासाठी प्रत्यक्ष चळवळीत उतरायला हवे

विरार : आजकाल अनेक तरूण व्हॉट्सअ‍ॅपवरून मराठी भाषेचे गोडवे गाणारे संदेश फॉरवर्ड करत असतात. मात्र तरूणांनी केवळ व्हॉट्सअ‍ॅपवीर न होता मराठी भाषेच्या संवर्धनासाठी प्रत्यक्ष चळवळीत उतरायला हवे, असे प्रतिपादन सोमय्या महाविद्यालयाच्या मराठी विभागप्रमुख प्रमुख डॉ.वीणा सानेकर यांनी केले. विरारच्या विवा महाविद्यालयात मराठी राजभाषा दिनानिमित्त्त बदलती मराठी भाषा एक आव्हान या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी त्या बोलत होत्या. मराठी माणूसच आज मराठी भाषेपासून दुरावत चालला आहे याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.समाजात आज अनेक वर्ग आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणासाठी मराठी वापरली गेली, मतांसाठी मराठी वापरली गेली मात्र याच राजकारण्यांची मुले आज इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेत आहेत. मराठी भाषा बोलणारी माणसं आज सिंहासनावर बसली मात्र मराठी भाषा आज सिंहासनावर आहे का ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आपल्याला शिवाजी महाराज व बाबा आमटे आवडतात, त्यांचे कार्य आवडते व या कार्यावरील चित्रपटही आवडतात मात्र त्यांच्या कार्याचे अनुकरण करण्यासाठी फार थोडे पुढे येतात. केवळ शुभेच्छापत्रांवर किंवा टी-शर्टवर मराठी गीताच्या दोन चार ओळी लिहिणे एवढेच मराठीपण नाही मात्र मुले याकडेच वळतात कारण हे सोपे आहे. आपल्या भाषेचा आदर हा आपल्याला मनापासून असायला हवा असेही त्यांनी पुढे सांगितले.चीन व सौदी अरेबियाचे उदाहरण देत त्या म्हणाल्या की या देशांमध्ये त्यांना अपेक्षित असे त्यांच्या भाषेचा समावेश असलेले संगणकच बनवले जातात मात्र भारतात तसे दिसून येत नाही. इंग्रजी भाषा बोलण्यात मराठी मुलांनी कुठेच मागे राहू नये. मात्र ती बोलत असताना आपली भाषा कुपोषित ठेवू नका असे आवाहनही त्यांनी विद्यार्थ्यांना केले. या कार्यक्र माचे प्रास्ताविक मराठी वाड्मय मंडळाच्या प्रमुख प्रा. कविता पाटील यांनी केले, सूत्रसंचालन प्रा.हर्षिवर्धनी बोरवणकर यांनी केले तर प्रा.रूपाली पाटील यांनी आभार मानले.मराठी राजभाषा दिनानिमित्त दुसऱ्या पर्वात काव्यवाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांनी कुसुमाग्रजांच्या कविता सादर केल्या.आपली दिवसाची सुरवातच व्हॉट्सअ‍ॅप वरून गुड मॉर्नींगने होत. परंतु, जगातील शक्तीशाली देशांनी आपापल्या भाषेत कारभार व्यवहार केले म्हणून ते पुढे गेले, असेही मत त्यांनी मांडले.