शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

खंडणी प्रकरणात वकील सहआरोपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 00:18 IST

माहिती अधिकार कायद्याच्या वापरातून खंडणीखोरी करणाऱ्यांविरोधात वसईत सुरु असलेल्या मोहिमेत राजिकय नेते, माहिती अधिकार कार्यकर्ते यांच्या पाठोपाठ काही पत्रकारांवरही गुन्हे दाखल झाले आहेत

पारोळ : माहिती अधिकार कायद्याच्या वापरातून खंडणीखोरी करणाऱ्यांविरोधात वसईत सुरु असलेल्या मोहिमेत राजिकय नेते, माहिती अधिकार कार्यकर्ते यांच्या पाठोपाठ काही पत्रकारांवरही गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणात आता वसईतील नामांकित वकील, तथा बार असोसिएशन आॅफ वसईचे अध्यक्ष अ‍ॅड. नोएल डाबरे यांना सहआरोपी केल्याने वसईत खळबळ उडाली आहे.वसईतील संजय कदम याच्यावर माहिती अधिकार कायद्याचा गैरवापर करून बांधकाम व्यावसायिकांकडून खंडणी मागितल्याचे दोन गुन्हे वसई पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत. ३१ मार्च रोजी वसईतील बांधकाम व्यावयासिक खालिद शेख याचेकडून संजय कदम याने साडेपाच लाख रु पयांची खंडणी मागितल्याची तक्र ार दिल्यानंतर कदम विरोधात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात कदम फरार होता. मात्र अचानक वसई पोलिसांनी या गुन्ह्यात कदम याचे साथीदार म्हणून डाबरे आणि चव्हाण यांना सहआरोपी दाखवले आहे.समाजात स्वच्छ प्रतिमा असलेल्या वकिलांना सहआरोपी करताना पोलीसांनी कोणतीही शहानिशा वा पुराव्यांची खातरजमा केली नसल्याचे, तसेच या कारवाईचा आम्ही निषेध करीत असल्याचे वकील संघटनेच्या पदाधिकाºयांनी म्हटले असून अ‍ॅड. डाबरे आणि त्यांच्या सहकारी वकिलावर आकस आणि सूडबुध्दीने ही तक्रार दाखल करण्यात आली असून निष्पक्ष चौकशी करून न्याय देण्याची मागणी एका ठरावाद्वारे बार असोसिएनशने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. दरम्यान, अ‍ॅड. डाबरे अणि अ‍ॅड. चव्हाण यांनी वसई न्यायालयातून या प्रकरणात अटकेविरोधात अंतरिम अटकपूर्व जामिन मिळवला आहे.