शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

यूपीला गावी पळण्याच्या तयारीत असताना लॅपटाॅपचोर जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 23:45 IST

रेल्वे पोलिसांची कारवाई : चोरलेला मुद्देमाल केला जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कवसई : वसई रोड रेल्वे पोलिसांच्या गुन्हे शाखेने नोकरीच्या शोधात असलेल्या एका तरुणाचा लॅपटॉप व मोबाइल फोन चोरणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे. महेंद्रकुमार सैनी (३४, रा. अंधेरी) असे या आरोपीचे नाव असून रेल्वे पोलिसांनी त्याच्याकडून चोरलेला लॅपटॉप व मोबाइल जप्त केला आहे.रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी या घटनेतील आरोपी महेंद्र कुमारने सफाळे येथील एका तरुणाला चांगल्या ठिकाणी नोकरीला लावण्याचे आमिष दाखवले होते. यासाठी त्याच्याजवळ असलेला लॅपटॉप सोबत घेऊन विरार रेल्वे स्थानकात भेटण्यासाठी बोलावले असता तेथे आरोपीने लॅपटॉपवर काम करण्याचा बहाणा करून तक्रारदार तरुणाला झेरॉक्स काढण्यासाठी पाठवले. ही संधी साधून तरुणाचा मोबाइल व लॅपटॉप घेऊन तो पसार झाला होता.

दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणाने वसई रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. रेल्वे स्थानकात असलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली. गुप्त बातमीदारांच्या मदतीने हा आरोपी गावी पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली असता आरोपी बोरीवली रेल्वे स्थानकातून उत्तर प्रदेश येथे जाणाऱ्या गाडीत बसला होता. मात्र, पोलिसांच्या पथकाने त्याला सोमवारी धावत्या ट्रेनमधून पकडून अटक केली. त्याच्याकडून चोरलेला डेल कंपनीचा लॅपटॉप व रियल मी कंपनीचा मोबाइल, असा एकूण ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलीस निरीक्षक सचिन इंगोळे यांनी दिली.

 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार