शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींची जमीन ठेकेदाराने लाटली, दुर्वेस ग्रा.पं.तील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 05:59 IST

दुर्वेस गावातील आदिवासींच्या नावे असणाऱ्या नवीन शर्त जमिनीमध्ये अतिक्रमण करुन बांधकाम करणाºया ठेकेदाराला ग्रामपंचायतीने नोटीस देऊनही तिस त्याने के राची टोपली दाखविली आहे.

- आरिफ पटेलमनोर  - येथील दुर्वेस गावातील आदिवासींच्या नावे असणाऱ्या नवीन शर्त जमिनीमध्ये अतिक्रमण करुन बांधकाम करणाºया ठेकेदाराला ग्रामपंचायतीने नोटीस देऊनही तिस त्याने के राची टोपली दाखविली आहे. संबधित बांधकामाला महसूल खात्याचीही परवानगी नसल्याने व जमिन मालकांचा विरोध असल्याने त्यावर कारवाईची मागणी होत आहे.राकेश मिश्रा या ठेकेदाराने दुर्वेस ग्रामपंचायतीच्या हद्दीतील या जमिनीवर अतिक्रमण करुन आपली दादागिरी चालविली असल्याची तक्रार संतोष रामा पाडोस व सोन्या लाडका डावरे यांनी दुर्वेस ग्रामपंचायतीकडे केली आहे. मौजे दुर्वेस येथील गट क्रंमाक १३०/२ क्षेत्र १-०-१ हे आर जमिनीत ग्रामपंचायतीची व महसूल विभागाची परवानगी न घेता भिंतीचे कुंपण टाकून त्या आत एका शेडची उभारणी केली आहे.विशेष म्हणजे जमिन मालक असणाºया आदिवासी कुटुंबियाना ठेकेदार संबधित जागेमध्ये प्रवेश करु देत नाही. त्या बाबत दुवैस ग्रामपंचायतीने त्यास नोटीस बजावली असून कारवाईचा इशारा दिला आहे. मात्र ठेकेदार मिश्राने त्यास धुप घातलेली नाही. सदरची नोटीस न स्विकारुन त्याने स्वत: जवळची कागदपत्रे सुद्धा दाखविलेली नाहीत. लोकमतने मिश्रा यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान, त्या संदर्भात या गरीब आदिवासींनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दाद मागितली आहे.रात्रीस खेळ चाले...ठेकेदाराच्या दांडगायी विरोधात मुळ मालकांनी ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय (सजा) व मंडल अधिकारी कार्यालयाकडे तक्रार केल्यानंतर त्या जागेवरील बांधकाम बंद पाडण्यात आले आहे. मात्र, ठेकेदार मिश्रा हा रात्री ते काम पुर्णत्वास नेत असल्याने पेचप्रसंग निर्माण झाला आहे. त्यासंदर्भामध्ये प्रविण सांबरे यांनी मंडल अधिकाºयांना तक्रार केली आहे.नवीन करार म्हणजे काय?ही जमिन आदिवासी व्यक्तीला शासनाकडून शेतीसाठी दिलेली आहे. त्यास नवीन शर्त संबोधले जात असून मुळ मालकाच्या परवानगीने शासनाला तिची किंमत देऊन कागदोपत्री ती नावे करण्याची प्रोसेस पुर्ण करावी लागते.हे सोपस्कर पार पाडल्यानंतर ती जुन्या शर्तमध्ये परावर्तित होते. दरम्यान, नविन शर्त जमिनीवर कोणतेही बांधकाम करता येत नाही.सदर जमिन नवीन शर्तीतील असल्यास व तिची जुन्या शर्तीमध्ये रुपांतर झाले नसल्यास. महसून प्रशासन कारवाई करुन ती ताब्यात घेईल.- नवनाथ झरे, निवासी उपजिल्हाधिकारी (पालघर)

टॅग्स :Vasai Virarवसई विरारnewsबातम्या