शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
4
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
5
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
6
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
7
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
8
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
9
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
10
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
11
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
12
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
13
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
14
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
15
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
16
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत मुसक्या आवळल्या
17
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
18
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
19
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार

मजूर महिलाही साधतात मोबाइलवरून संवाद

By admin | Updated: January 18, 2016 01:51 IST

विक्रमगड तालुका हा अदिवासी भाग असून खेड्यापाड्यांत विखुरलेला आहे़ येथे शेतीव्यतिरिक्त अन्य दुसरे रोजगार देणारे मुख्य साधन नाही.

तलवाडा : विक्रमगड तालुका हा अदिवासी भाग असून खेड्यापाड्यांत विखुरलेला आहे़ येथे शेतीव्यतिरिक्त अन्य दुसरे रोजगार देणारे मुख्य साधन नाही. त्यामुळे उर्वरित शेती हंगाम सोडला तर मजुरीशिवाय पर्याय नाही़ मात्र, या भागातील खेड्यापाड्यांतील मजूर आदिवासी अशिक्षित महिलांनाही संपर्क, संवादाची साधने खेड्यापाड्यांत उपलब्ध झाल्याने घराबाहेर, शेतावर, बाजारात काम करणाऱ्या स्त्रियांनीही आता मोबाइल संवाद सुरु केल्याने अच्छे दिनचा अनुभव येत आहे़ सध्याचे युग हे आधुनिक युग असल्याने काही आधुनिक गोष्टी वापराकरिता फारशा ज्ञानाची आवश्यकता लागत नाही. त्यातील एक मोबाइल हे साधन स्वस्त व वापरण्यास सोपे असल्याने शेतावर, घराबाहेर काम करताना सेल फोन जवळ असल्याने पती, मुलगा, आई, वडील, नातेवाईक, मित्र मंडळी यांच्याशी थेट संवाद साधता येत असल्याचे येथील सारशी, तलवाडा येथील खेड्यांवर राहणारी महिला बायती सावजी भावर या रानभाजी विकणाऱ्या व रोजंदारीवर काम करणाऱ्या महिलेने सांगितले़ तर, दुसरीकडे तू कुठे आहेस, तू कशी आहेस, काम आटोपले का, असा संवाद माझा नवरा मोबाइलवर सतत साधत असतो़ त्यामुळे आमचे भावनिक नाते अधिक सुरक्षित, अधिक घट्ट असल्याचे सविता कासट यांनी लोकमतशी बोलताना सांगितले़ आम्ही शेतावर किंवा बाहेर काम करीत असतो़ कधीकधी शहरात रोजगारासाठी स्थलांतर करावे लागते़ सासू, सासरे, मुले शिक्षणासाठी घरी असतात. त्यांची खुशाली, आजारपण याची माहितीदेखील क्षणाक्षणाला आम्हाला या मोबाइलमुळे मिळते़ आम्ही लांब असलो तरी आमच्या कुटुंबाला सुरक्षित वाटते़ या अगोदर आम्ही बाहेर असल्याने आमच्या गावाकडील कुटुंबाची काळजी वाटत होती. परंतु, आमच्याकडे मोबाइल असल्याने अधिक सुरक्षित आणि काळजीमुक्त झाल्याचे सुधा कोरडा या स्थलांतरित महिलेने सांगितले़ मोबाइल हा आमच्या कुटुंबाचा आधार झाला असून आदिवासींच्या झोपडीत एक क्रांती झाल्याचे अनेक महिलांनी आपले मत मांडले. संपर्काचे उत्तम साधन मिळाल्याने तोट्यापेक्षा फायदाच झाल्याचे समाधान अनेक आदिवासी महिलांनी व्यक्त केले़.