शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोकणचा निर्विघA प्रवास विघAहत्र्याच्याच हाती

By admin | Updated: August 20, 2014 22:24 IST

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 17 च्या रायगड जिल्हय़ातील पळस्पे (पनवेल) ते इंदापूर टप्प्यातील महामार्गाचे विस्तारीकरण सुरू आहे.

जयंत धुळप - अलिबाग
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 17 च्या रायगड जिल्हय़ातील पळस्पे (पनवेल) ते इंदापूर टप्प्यातील महामार्गाचे विस्तारीकरण सुरू आहे. मात्र त्यात प्रचंड दिरंगाई झाल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. इंदापूर ते कशेडी (पोलादपूर) हा टप्पा देखभालीअभावी धोकादायक बनला आहे. गणोशोत्सवाकरिता वाहतूक सुरळीत करण्याकरिता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास 2क् ऑगस्ट ही अंतिम मुदत देण्यात आली होती. या मुदतीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण पूर्णपणो अपयशी ठरले आहे. 
महामार्ग दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. या कामाकरिता सार्वजनिक बांधकाम विभागास केवळ तीन दिवसांचा कालावधी देण्यात आल्याने महामार्ग दुरुस्ती कामाची केवळ वरवरची मलमपट्टीच होवू शकणार असल्याने यंदा कोकणात गणोशोत्सवाकरिता जाणा:या चाकरमान्यांचा निर्विघ्न कोकण प्रवास केवळ विघ्नहर्ता गणोशाच्याच हाती राहणार असल्याचे बुधवारी स्पष्ट झाले आहे.
 
बांधकाम मंत्र्यांचे 
आदेशही फुकट
गणोशोत्सवानिमित्त मुंबई, ठाणो, कल्याण परिसरातील कोकणवासीय मोठय़ा प्रमाणात कोकणात जातात. गणोश उत्सवाच्या तीन दिवस अगोदरपासून आजवरच्या सव्रेक्षणानुसार 7क् हजार छोटी चारचाकी वाहने व 2क् हजार एस.टी. व खाजगी बसेसच्या माध्यमातून तब्बल 2क् लाख तर कोकण रेल्वेच्या माध्यमातून 1क् लाख प्रवासी कोकणामध्ये गणोश उत्सवासाठी जातात. या पाश्र्वभूमीवर गोवा महामार्ग दुरवस्था समस्येवर तोडगा काढण्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठकही झाली होती. या बैठकीमध्ये भुजबळ यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास रस्ते दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण करण्याबाबत सूचना देवून रस्ते दुरुस्तीचे काम 2क् ऑगस्टर्पयत तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले होते. तथापि, रस्त्याची पाहणी केली असता रस्ते दुरुस्तीचे काम आवश्यक त्या गतीने अद्याप सुरुही करण्यात आले नसल्याचे जिल्हाधिकारी भांगे यांनी बुधवारी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव शामल मुखर्जी यांना पाठविलेल्या तातडीच्या पत्रत नमूद केले आहे.
 
अर्धा किमी महामार्गाचे डांबरीकरण
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून येत्या तीन दिवसांत होणा:या महामार्ग दुरुस्ती कामाचा खर्च, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून वसूल करण्यात येणार आहे आणि त्यास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मान्यताही दिल्याची माहिती रायगडचे जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांनी दिली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नियुक्त केलेले महामार्ग विस्तारीकरण कामाचे कंत्रटदार अनुक्रमे सुप्रिम इन्फ्रास्ट्रक्चर्स प्रा.लि. व महावीर  सुप्रिम इन्फ्रास्ट्रक्चर्स प्रा.लि. यांनी केवळ पेण (रामवाडी) येथे अर्धा किमी अंतराच्या महामार्गाचे डांबरीकरण केले आणि उर्वरित टप्प्यात दुरुस्ती काम सुरु देखील केलेले नसल्याचे जिल्हाधिकारी भांगे यांनी प्रत्यक्ष पाहणीअंती शासनास दिलेल्या अहवालात नमूद केले आहे.
 
आठ ते दहा तास वाहतूक कोंडीचा इशारा
गणोशोत्सवाच्या तीन दिवस अगोदर बहुसंख्य प्रमाणात वाहनांची वाहतूक सुरु होते. जर तत्पूर्वी रस्ते दुरुस्ती झाली नाही तर निश्चितपणो वाहतुकीची कोंडी निर्माण होईल. यापूर्वी गणोश उत्सवाच्या काळात आठ ते दहा तास वाहतुकीची कोंडी निर्माण झाल्याची उदाहरणो असल्याचेही भांगे यांनी स्पष्टपणो म्हटले आहे. दरम्यान, 2क् ऑगस्टर्पयत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने रस्ते दुरुस्तीचे काम पूर्ण केले नाही. महामार्ग दुरुस्तीचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने विहित वेळेत पूर्ण केले नसल्याने आता पनवेल ते गोवा या राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत 23 ऑगस्टर्पयत पूर्ण करण्यात यावे, असे जिल्हाधिकारी भांगे यांनी बुधवारी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभाग सचिव शामल मुखर्जी यांना पाठविलेल्या पत्रत नमूद केले आहे. बांधकाम विभागाकडे रस्ते निर्मिती व दुरुस्तीकरिता आवश्यक अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध नाही, त्याचबरोबर ज्या कंत्रटदारांकडून पूर्वी रस्त्यांची कामे करुन घेतली आहेत, त्यांच्या कामांची बिले त्यांना अदा करण्यात निधी अभावी मोठी समस्या असल्याने आता कंत्रटदार दुरुस्तीच्या कामाकरिता तयार होण्याच्या मानसिकतेत नाही. त्यामुळे महामार्ग दुरुस्तीचे काम आणि तेही तीन दिवसात करायचे कसे असा प्रश्न सार्वजनिक बांधकाम विभागापुढे उभा ठाकला आहे.
 
कोकणात जाणारे चाकरमानी व गणोश भक्तांच्या भावनांचे सरकारला काही देणो घेणो नाही. रस्त्यांची दुर्दशा अनेक दिवसांपासून आहे, मात्र लालफितीत कागदी घोडे नाचवण्यापलिकडे सरकारी यंत्नणोने काही केलेले नाही. गणोशोत्सवात प्रवास करणा:या लोकांनी जीव मुठीत धरून प्रवास करावा, अशी सरकारची अपेक्षा आहे का, अशा वेळी जर अपघात झाला तर त्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम खाते वा सरकार स्वीकारणार का?
- अॅड.गौतम पाटील, 
अध्यक्ष, सार्वजनिक वाचनालय 
व जिल्हा ग्रंथालय, अलिबाग.
 
गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अत्याधुनिक दुरवस्था झालेल्या महामार्गाच्या टप्प्यात वडखळ या ठिकाणच्या जयकिसान विद्यामंदिरातील वरिष्ठ शिक्षिका व कवयित्री स्मिता सहस्त्रबुद्धे या दररोज आपल्या विद्याथ्र्यासमवेत या महामार्ग दुरवस्था व धोक्याचा अनुभव घेत असतात. त्यांनी या महामार्ग दुरवस्थेवर एक कविताही लिहिलेली आहे.