शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

कोंढले वीज उपकेंद्राचे भिजत घोंगडे

By admin | Updated: August 24, 2015 23:20 IST

तालुक्यातील वाढती लोकसंख्या, औद्योगिकीकरण आणि मागणीचा विचार करून महावितरणने कोंढले येथे २०११ मध्ये ४०० के.व्ही.ए.च्या वीज उपकेंद्राला मंजुरी देऊन याच वर्षी त्या कामाला

- वसंत भोईर,  वाडातालुक्यातील वाढती लोकसंख्या, औद्योगिकीकरण आणि मागणीचा विचार करून महावितरणने कोंढले येथे २०११ मध्ये ४०० के.व्ही.ए.च्या वीज उपकेंद्राला मंजुरी देऊन याच वर्षी त्या कामाला सुरुवात केली होती. मात्र, ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे या कामाची मुदत संपून गेली तरी ते काही पूर्ण झाले नाही. त्यामुळे कुडूस परिसरातील उद्योजक व नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. हे काम त्वरित सुरू करावे, अशी मागणी पंचायत समितीच्या माजी सदस्या अंकिता दुबेले यांनी केली आहे.वाडा तालुक्यात ‘डी प्लस’ झोनमुळे उद्योगधंदे वाढले. वांध्रे (वाडा) येथे असलेल्या वीज वितरण केंद्रावर मोठा भार पडत होता. तसेच गावागावांच्या वीज जनित्रांमध्ये बिघाड होऊन अनेक गावे विनावीज राहत असल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. त्यावर उपाय म्हणून वीज वितरण कंपनीने येथे ४०० के व्ही उपकेंद्राला मंजुरी दिली. २०११ मध्ये १९.७५ हेक्टर जागेवर २२ महिन्यांच्या मुदतीत हे काम पूर्ण करण्याच्या अटीवर महावितरणकडून या कामाचा ठेका ४२० कोटींना ज्योती स्ट्रक्चर या कंपनीला देण्यात आला. या कंपनीने एक वर्ष हे काम अर्धवट केले. त्यानंतर, मुदत संपून आता ४ वर्षे झालीत, तरी काम बंद आहे. या उपकेंद्रातून वीज मिळेल, या आशेवर तीनशेपेक्षा जास्त उद्योजक आपली कंपनी सुरू करण्याच्या प्रतिक्षेत आहेत. मात्र, वीज उपलब्ध होत नसल्याने त्यांच्या कंपन्या बंद आहेत. शिवाय, या परिसरातील विजेच्या लपंडावाने येथील नागरिकसुद्धा त्रस्त झाले आहेत.अन्यथा आंदोलन हाच मार्ग...या वीज उपकेंद्राचे घोंगडे भिजत राहिल्याने उद्योजकांसह नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. म्हणून महावितरणने याची तत्काळ दखल घेऊन उपकेंद्राचे हे काम त्वरित सुरू करावे, अन्यथा आंदोलन छेडू, असा इशारा अंकिता दुबेले यांनी दिला आहे.पावसाळ्याचे कारण : यासंदर्भात महावितरणचे वाड्याचे उपअभियंता लक्ष्मण राठोड यांच्याशी संपर्क साधला असता हे काम महाट्रान्समिशनकडे सोपविले असल्याची माहिती त्यांनी दिली. तर, महाट्रान्समिशन कल्याणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता ए.वाय. सुरालकर यांच्याशी संपर्क साधला असता पावसाळा असल्यामुळे इलेक्ट्रीकल कामे करता येत नाहीत, तर सिव्हीलची कामे सुरू असल्याचे लोकमतला सांगितले.