शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

खोडकांनी शोधला बिनविजेचा पंप

By admin | Updated: January 2, 2017 03:33 IST

अनेकदा जवळ पाण्याचे स्रोत असूनही वीज नसल्याने शेतीसाठी पाणी आणता येत नाही. काहींना तिच्या मोटरसाठी लागणारा इंधन खर्च परवडत नाही

पंकज पाटील, बदलापूर अनेकदा जवळ पाण्याचे स्रोत असूनही वीज नसल्याने शेतीसाठी पाणी आणता येत नाही. काहींना तिच्या मोटरसाठी लागणारा इंधन खर्च परवडत नाही. यावर बदलापूरजवळील चोण गावात राहणाऱ्या रामचंद्र खोडका या आदिवासी समाजातील व्यक्तीने या समस्येवर उपाय शोधला आहे. जुजबी यांत्रिक कौशल्याच्या बळावर पाण्याच्याच प्रवाहाचा वापर करून विनाइंधन पाणी उपसा करणारे यंत्र त्यांनी तयार केले आहे. त्यातून ते शेतीला पाणी पुरवतात, पण लवकरच त्यावर वीजनिर्मिती करण्याचा त्यांचा विचार आहे. सध्या चोण गावाजवळून वाहणाऱ्या बारवी नदीच्या प्रवाहात त्यांनी हे यंत्र बसविले असून त्याद्वारे कोणतेही इंधन न वापरता पाणी उपसले जात आहे. या यंत्राच्या पेटंटसाठीही त्यांनी अर्ज केला आहे. आयटीआयमधून वेल्डरचा पदविका अभ्यासक्र म पूर्ण केलेल्या खोडका यांनी काही काळ स्वत:चे वर्कशॉप टाकून व्यवसाय केला. नंतर राज्य परिवहनच्या कर्जत आगरात तांत्रिक कारागिर म्हणून त्यांची नेमणूक झाली. नोकरीबरोबरच चोण गावात ते शेतीही करतात. गावालगत नदी असूनही विजेअभावी त्यांना शेतीसाठी पाणी उपसून आणता येत नव्हते. डिझेलवर मोटर चालविणे परवडणारे नव्हते. त्यामुळे कोणत्याही इंधनाचा वापर न करता नदीतले पाणी उपसून आणता येईल का, याचा विचार ते करू लागले.