शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

मुरबाड विधानसभेत कथोरेंनी तारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 23:37 IST

युतीचा धर्म पाळला गेल्याने मतांची टक्केवारीही वाढलेली

खासदार कपिल पाटील यांच्या विजयात महत्त्वाचा वाटा हा मुरबाड विधानसभा मतदारसंघाने उचलला आहे. पाटील यांच्याविरोधात मतदारसंघात नाराजी असतानाही ही नाराजी दूर सारण्यात आमदार किसन कथोरे यांना यश आले आहे. त्यातच, मुरबाडमध्ये युतीचा धर्म पाळला गेल्याने मतांची टक्केवारीही वाढलेली आहे. ६४ हजारांच्या मतांची आघाडी ही निर्णायक ठरली.

पाटील यांच्याविरोधात मुरबाड आणि बदलापूरमध्ये नाराजी होती. शिवसैनिक नाराज असतानाही या मतदारसंघात पाटील यांना चांगले मताधिक्य मिळवण्यात यश आले आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराची धुरा ही आमदार कथोरे यांच्यावर होती. पाटील यांनी जास्तीतजास्त वेळ हा मुरबाड मतदारसंघातच दिला. त्याचा फायदा त्यांना झाला आहे. मुरबाड मतदारसंघात बदलापूरचे शिवसेना शहराध्यक्ष वामन म्हात्रे यांनीही पाटील यांच्यासोबत जमवून घेतल्याने त्याचा फायदा झाला. बदलापूरमधील ग्रामीण भाग आणि शहरी भागातही शिवसेनेच्या नगरसेवकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी कामे केल्याने पाटील यांचा विजय निश्चित झाला.

मुरबाड मतदारसंघात शिवसेनेची ताकद ही कमी असली, तरी भाजपसोबत काम करण्यात त्यांनीही कमीपणा घेतला नाही. काही भागात नाराज शिवसैनिक हे तटस्थ राहिल्याने त्याचा परिणाम होईल, असे वाटत होते. मात्र, प्रत्येक ठिकाणी पाटील यांना टावरे यांच्या तुलनेत दुप्पट मते मिळत होती.कथोरेंसाठी विधानसभा सोपीगेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार किसन कथोरे हे २५ हजारांहून अधिक मताधिक्याने निवडून आले होते. त्यातच गेल्या पाच वर्षांत झालेल्या कामांच्या जोरावर आगामी निवडणूकही त्यांना सोपी आहे. त्यातच युती करून निवडणूक लढवल्यास कथोरे यांचे मताधिक्य हे वाढण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. तर, युती न करता लढल्यास कथोरे यांना पूर्वीच्या मताधिक्यापेक्षा जास्त मताधिक्य घेण्यासाठी पुन्हा एकदा कौशल्य दाखवण्याची वेळ येणार आहे. तर, राष्ट्रवादीला या मतदारसंघात हवा तसा प्रतिसाद लाभत नाही, हे पुन्हा एकदा समोर आले आहे.की फॅक्टर काय ठरला ?गेल्या पाच वर्षांत मतदारसंघात शिवसेनेसोबत वैर केलेले असतानाही कपिल पाटील यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना हाताशी धरून शिवसैनिकांना काम करण्यास भाग पाडले.मुरबाड मतदारसंघात शेवटच्या वर्षात कामे मंजूर करून मतदारसंघातील नाराजी दूर करण्याचा प्रयत्न त्यांच्या पथ्यावर पडला. त्यातच मुख्यमंत्री यांनीही मतदारसंघातील कामांचे श्रेय दिले.पाटील यांनी आमदार कथोरे यांच्यासोबत जमवून घेतल्याने त्याचा फायदा त्यांना झाला आहे. कथोरे यांनीही पूर्ण ताकदीने काम केले. त्यातच मनसे फॅक्टरचा प्रभाव न पडल्याने त्याचाही लाभ झाला.