शहरं
Join us  
Trending Stories
1
ISRO आणखी एक विक्रम रचणार! २०३५ पर्यंत भारतीय अंतराळ स्टेशन बनवणार, पाहा कसं दिसतं मॉडेल?
2
भाजपाला कधी मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष?; अचानक घडलेल्या घडामोडींमुळे झाला विलंब, काय आहे कारण?
3
Video: फटाक्यांच्या आवाजानं बैल उधळला, सगळीकडे गोंधळ; गावकऱ्यांची झाली पळापळ, १ जण जखमी
4
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
5
टिकटॉक भारतात परत सुरू होणार? नवीन अपडेट आली, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
6
Video: इलेक्टिक कारच्या ऑटोमेटिक फिचरनं घेतला मालकाचा जीव?; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
7
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
8
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
9
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
10
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
11
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
12
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
13
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
14
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
15
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
16
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
17
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
18
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
19
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
20
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर

वैतरणा नदीतून रेतीउत्खनन सुरूच

By admin | Updated: June 15, 2017 02:30 IST

वैतरणा नदीवरील रेल्वे पुलाच्या खालून जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाला न जुमानता संबंधित तलाठी, मंडळ अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने खाजगी वाहतूक सुरु

लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : वैतरणा नदीवरील रेल्वे पुलाच्या खालून जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाला न जुमानता संबंधित तलाठी, मंडळ अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने खाजगी वाहतूक सुरु असून पुलाजवळील प्रतिबंधित क्षेत्रात दिवसा ढवळ्या रेती उत्खनन सुरु आहे. यामुळे रेल्वे पुलाला असलेला धोका दिवसेंदिवस वाढत असून प्राणहान घडल्यानंतरच महसूल आणि रेल्वे प्रशासनाचे डोळे उघडणार आहेत काय? जिल्हाधिकारी प्रतिबंधक आदेश काढून तर रेल्वे प्रशासन पुलाला कोणताही धोका नसल्याचे मोघम उत्तर देऊन प्रवाशांच्या जीवितांशी जीवघेणा खेळ खेळत असल्याच्या संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत.महाडच्या सावित्री नदीवरील धोकादायक पूल कोसळून झालेल्या दुर्घटने नंतर सर्वच जुन्या व धोकादायक पुलाचे स्ट्रुक्चरल आॅडिटचा प्रश्न ऐरणीवर आला होता. मुंबई-गुजरात-दिल्ली आदी राज्यांना जोडणारा सफाळे-वैतरणा पूल पश्चिम रेल्वे चा एक महत्त्वपूर्ण दुवा ठरलेला आहे.शंभर वर्षाचे आयुमान असलेला हा ९२ व ९३ क्रमांकाचा ब्रिटिश कालीन पूल ऊन, वारा, पाऊस, समुद्राच्या लाटाचा मारा आणि रेल्वेच्या शेकडो फेऱ्याचा भार सांभाळून जीर्ण झाला आहे. या पुलाचे आयुष्यमान घटल्याने बांधण्यात येत असलेल्या नवीन पुलाचे काम रेल्वे आणि ठेकेदारांच्या आठमुडे धोरणामुळे जवळपास ७ वर्षापासून बंद आहे.या पुलाखाली आणि आसपासच्या प्रतिबंधित भागात मोठ्या प्रमाणात चोरट्या पद्धतीने रेती उत्खनन होत असल्याच्या तक्र ारी नंतर तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी महसूल, रेल्वे प्रशासन, पोलीस इ. ची बैठक घेऊन व मोठ्या प्रमाणात वसई, पालघरमधील रेती बंदरावर चोरट्या पद्धतीने चालू असलेल्या रेती उत्खनना वर धाड घालून अनेक बोटी,सक्शन पंप,व इतर सामग्री नष्ट केली होती.व प्रत्येक बंदरात सीसी टीव्ही कॅमेरे,कारवाई टीम नियुक्त केल्या होत्या. त्यामुळे सर्व बंदरावरील चोरटी रेती वाहतूक ठप्प पडली होती. त्यांची बदली झाल्यानंतर रेतीचोरांविरोधात महसूल विभागाने आवळलेला फास हळूहळू सैल होत चालल्याचे निदर्शनास येत असून सफाळे-वैतरणा पुलाच्या आजूबाजूच्या प्रतिबंधित क्षेत्रा मध्ये दिवसा ढवळ्या रेती उत्खनन सुरु झाले आहे. वाढीव बेटाच्या संरक्षित बंधाऱ्या लगतची रेती काढली जात असल्याने या गावातील सुमारे दोन हजार लोकांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याची तक्रार ग्रामस्थ अनेक महिन्यापासून करीत आहेत. मात्र त्यांचा आवाज महसूल विभागाच्या कानापर्यंत पोहचूनही कारवाई करण्यासाठी आमच्याकडे पर्याप्त साधने नसल्याची ओरड सफाळ्याचे मंडळ अधिकारी, तलाठी करीत आले आहेत. त्यामुळेच चोरट्या रेतीची वाहतूक सुरु आहे. मोठ्या प्रमाणात रेल्वे पुलाच्या खालून रेती वाहतूक व उत्खनन सुरु असताना त्यांच्यावर कारवाई करण्या ऐवजी जिल्हाधिकारी फक्त वैतरणा पुला खालून नौकानयनास आणि ६०० मीटर्स प्रतिबंधित भागात रेती उत्खननास बंदी असल्याचा मनाई आदेश काढून आपली जबाबदारी झटकण्याचे काम करीत असल्याची भावना बाधित लोक व्यक्त करीत आहेत. त्याचा गैरफायदा रेतीमाफिया आणि त्यांना मदत करणारे काही अधिकारी उचलीत असल्याने रेल्वे पुलाचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे.राज्यसरकार आणि रेल्वे प्रशासन एकमेकांवर जबाबदारी ढकलीत असून या ढकला ढकलीत सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांच्या हकनाक बळी जाणार आहे.- प्रथमेश प्रभुतेंडुलकर, सहसचिव, डहाणू वैतरणा प्रवासी संघया बेकायदेशीर रेती उत्खननामुळे आमच्या वाढीव गावाचा बंधारा खचत चालल्याची तक्र ार करूनही तिची दखल घेतली जात नाही. - दशरथ किणी, गोकुळ भगत,ग्रामस्थ, वाढीव