शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जव्हारच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या होतील का ?

By admin | Updated: May 8, 2016 02:53 IST

शासननियमाप्रमाणे दर वर्षी मे मध्ये ज्या अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची एकाच ठिकाणची तीन वर्षांची सेवा पूर्ण झालेली असते त्यांची बदली व्हावी, असा दंडक असतांना जव्हारमध्ये

जव्हार : शासननियमाप्रमाणे दर वर्षी मे मध्ये ज्या अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची एकाच ठिकाणची तीन वर्षांची सेवा पूर्ण झालेली असते त्यांची बदली व्हावी, असा दंडक असतांना जव्हारमध्ये गेल्या कित्येक वर्षापासून अधिकारी तथा कर्मचारी एकाच ठिकाणी संबंधित टेबलचा कार्यभार सांभाळत आहे. जिल्ह्यातील विविध कार्यालयातील विभागातल्या कर्मचाऱ्यांच्या दरवर्षी अशा स्वरुपात बदल्या केल्या जातात, मात्र जव्हार त्याला अपवाद आहे काय? कारण जव्हारमधील कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या बदल्याच होत नाहीत. ते वर्षानुवर्षे एकाच जागी ठाण मांडून बसलेले आहेत. जव्हार तालुका हा ९९ टक्के आदिवासी तालुका असल्यामुळे येथील बराचसा आदिवासी बांधव अशिक्षित आहे, त्यामुळे त्याला नियमांची जाण नाही, परंतु काही सामाजिक कार्याकर्त्यांच्या माहिती नुसार विशिष्ट विभागात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मनमानीने कामे रेंगाळली जातात, याचा फटका येथील गरीब आदिवासी जनतेला बसत आहे.(वार्ताहर) बदल्या करून त्या रद्द करून घेण्याच्या प्रकारातही दरवर्षी मे महिन्यात वरीष्ठ कार्यालयात मोठ्या प्रमाणात अर्थकारणाची धावपळ सुरू असते. तीन वर्ष पूर्ण झालेले अधिकारी व कर्मचारी परत तेच कार्यालय मिळण्याकरीता मंत्रालयापासून तर वरीष्ठ कार्यालयात सेटींग लावून बदलीला स्थगिती मिळवून अथवा ती रद्द करून पुन्हा आपल्या जुन्या खुर्चीवर विराजमान होतात.ज्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना तीन वर्ष पूर्ण झालेले असतील त्यांची बदली दुसऱ्या कार्यालयात शासन निर्णयाप्रमाणे करण्याची मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते अलताफ शेख यांनी केली आहे.