शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

‘संथारा आत्महत्या’ : विरोधात जैनांचा मोर्चा

By admin | Updated: August 24, 2015 23:27 IST

‘संथारा’ साधना हे जैन समाजातील आत्मकल्याणाचे एक पवित्र माध्यम असून राजस्थान उच्च न्यायालयाने या साधनेला ‘आत्महत्या’समपद्धत असल्याचा निर्णय देत या पद्धतीवर

पालघर : ‘संथारा’ साधना हे जैन समाजातील आत्मकल्याणाचे एक पवित्र माध्यम असून राजस्थान उच्च न्यायालयाने या साधनेला ‘आत्महत्या’समपद्धत असल्याचा निर्णय देत या पद्धतीवर बंदी घालण्याचे आदेश दिले होते. या निकालाने जैन समुदायाच्या भावना दुखावल्याने राज्यपालांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून सर्वमान्य तोडगा काढावा, यासाठी सोमवारी जैन सकल संघ, पालघरच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.जैन समाजात ७५ ते ९० वयोमानानंतर परमेश्वराच्या चिंतनात एकरूप होऊन समाधीपूर्वक अवस्थेत अन्नत्याग करून ऐच्छिक मृत्यूच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या पद्धतीला पवित्र स्थान असून त्याला ‘संथारा’ असे संबोधले जाते. या पद्धतीविरोधात राजस्थान उच्च न्यायालयात एक याचिका दाखल झाल्यानंतर न्यायालयाने संथारा ही पद्धत आत्महत्यासम असल्याचा निर्वाळा देत या पद्धतीवर बंदी घातली होती. आत्मकल्याणाच्या दिशेने घेऊन जाणाऱ्या या पवित्र पद्धतीला आत्महत्येसारख्या स्वरूपाची उपमा दिल्याने जैन समाजात नाराजी पसरली होती. प्रथम तीर्थंकर भगवान आदिनाथांपासून चोविसावे तीर्थंकर भगवान महावीरांपर्यंत सलग चालत आलेल्या या वंशपरंपरागत संस्कृतीला या निर्णयामुळे धक्का बसून ती खंडित होते की काय, या विचाराने जैन समाजात अस्वस्थता पसरली आहे. राज्यपालांनी न्यायव्यवस्था तसेच प्रशासनाच्या मुद्यावर सर्वमान्य तोडगा काढावा, यासाठी सोमवारी जैन सकल संघ, पालघरच्या वतीने पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. या वेळी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना निवेदनही देण्यात आले. या मोर्चात महाविद्यालयीन तरुण-तरुणी, महिला उपस्थित होते. (वार्ताहर)