शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

धाकटी डहाणूत रेशनिंगवर निकृष्ट तांदूळ; ग्राहकांची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 02:59 IST

नवीन धान्य देण्याची पुरवठा विभागाची सूचना

बोर्डी : धाकटी डहाणू येथे उन्नती स्वयंसहायता महिला बचतगटामार्फत रास्तभाव धान्य दुकान चालवले जाते. मंगळवारी येथे लाभार्थ्यांना निकृष्ट दर्जाच्या तांदळाचे वाटप सुरू होते. याबाबत लाभार्थ्यांनी हे धान्य घेण्यास नकार दिल्याने वाटप थांबविण्यात आले. दरम्यान, निकृष्ट धान्य लाभार्थ्यांकडून परत घेण्यासह त्यांना नवीन धान्य देण्याच्या सूचना रास्त भाव दुकानदारांना दिल्याची माहिती डहाणू पुरवठा अधिकारी विनोद वागदे यांनी दिली.

डहाणूतील धाकटी डहाणू येथील रास्तभाव धान्य दुकानात मंगळवारी सकाळी लाभार्थ्यांना धान्याचे वाटप सुरू असताना काही ग्राहकांना निकृष्ट दर्जाचा तांदूळ मिळाला. ही कुजबुज सुरू असताना खराब तांदूळ मिळालेल्या लाभार्थ्यांची संख्या वाढून त्यापैकी काहींनी हे धान्य घेण्यास नकार दिला. त्यानंतर डहाणू पुरवठा अधिकाऱ्यांना तक्रार करीत निकृष्ट तांदळाचे फोटो पाठवले. त्यानंतर पुरवठा अधिकारी विनोद वागदे यांनी वितरण थांबविण्यासह तत्काळ चांगले धान्य देण्याच्या सूचना रास्त धान्य दुकानदाराला दिल्या आहेत. या दुकानात प्राधान्य कुटुंब लाभार्थी ५८७, तर अंत्योदय लाभार्थी १३७ असे  एकूण ७२४ लाभार्थी आहेत. दरम्यान, राज्यात ऑनलाइन धान्य वितरणप्रणाली विकसित होत आहे. या प्रणालीमध्ये स्वस्त धान्य वितरण व्यवस्था पॉस मशीनच्या माध्यमातून होत आहे. लाभार्थ्याला त्याच्या वाट्याचा लाभ मिळाल्यानंतर त्याची ऑनलाइन नोंदणी होते. या वितरण व्यवस्थेत हे आमूलाग्र बदल होत असताना निकृष्ट दर्जाचे धान्य लाभार्थ्यांच्या माथी मारले जात आहे. त्यापासून मुक्तता मिळणार कधी, असा प्रश्न विचारला जात आहे. 

निकृष्ट दर्जाचे धान्य असल्याची तक्रार प्राप्त झाली असून वाटप थांबवण्याच्या सूचना देण्यात आल्या. नवे धान्य देण्याच्या सूचना दिल्या आहेत. - विनोद वागदे, पुरवठा अधिकारी, डहाणू

सुमारे ५०० किलो तांदूळ खराब असल्याचे ग्राहकांनी निदर्शनास आणून दिले. त्यानंतर वाटपाचे काम तत्काळ थांबविण्यात आले. त्याची माहिती पुरवठा विभागाला देण्यात आली आहे. - अंजली माच्छी, अध्यक्ष, उन्नती स्वयंसहायता महिला बचतगट