शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

कोळंबीला झाली ‘व्हाइट स्पॉट’ची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 00:36 IST

संसर्गामुळे कोळंबीचा दर्जा घसरला; कोळंबी उत्पादक हवालदिल

डहाणू : एकीकडे सागरी मासेमारी व्यवसायात उत्पन्न कमी झाल्याने मासेमारी व्यवसाय तोट्यात गेला असताना त्याला पर्यायी आणि उपयुक्त व्यवसाय असलेल्या कोळंबी संवर्धन व्यवसायाला व्हाईट स्पॉट रोगाचा डाग लागला आहे. यामुळे कोळंबी उत्पादक हवालदील झाले आहेत. पालघर जिल्ह्यात एकूण १२० कोळंबी प्रकल्प असून त्यापैकी डहाणू तालुक्यात तब्बल ३१ कोलंबी प्रकल्प आहेत.पर्यावरणामुळे कवचधारी प्राण्यांना व्हाईट स्पॉटचा संसर्ग झाला असून त्याचा फटका कोळंबी उत्पादकांना बसला आहे. कोळंबीला पांढऱ्या रंगाचे ठिपके दिसू लागल्याने कोळंबीचा दर्जा घसरुन निर्यातीवर त्याचा परिणाम दिसला आहे. व्हाईट स्पॉटमुळे मांस आणि कवच यामध्ये ठिसूळपणा जाणवतो. तसेच कोळंबीची वाढ ज्या वेगाने व्हायला पाहिजे त्या वेगाने ती न होता वाढ खुंटते. यामुळे नुकसानीला तोंड द्यावे लागते.सागरी मासेमारीला पर्यायी आणि उपयुक्त व्यवसाय म्हणून महाराष्ट्र शासनाने काही वर्षापूर्वी मच्छीमारांसाठी डहाणू गाव, वडकुन, चिखले, सरावली, सावटा तसेच परिसरातील काही मच्छीमारांना कोळंबी संवर्धकांनी खाजण जागा भाडेपट्ट्याने दिल्या होत्या. तालुक्यातील अनेक मच्छिमारांनी पूरक आणि पर्यायी व्यवसाय म्हणून शासनाच्या खाजण जागेत कर्जाच्या सहाय्याने कोळंबी प्रकल्प विकसित केले आहेत. या व्यवसायात नफ्यापेक्षा आवश्यक लागणारे खाद्य, वीज, प्रोफाइल आदींच्या किंमतीत दिवसेंदिवस होणारी वाढ यामुळे उत्पादक हवालदिल झाला आहे.कोळंबीवरील व्हाईट स्पॉटची लागण होऊ नये यासाठी पाणी आणि कोळंबीची चाचणी करण्यासाठी पालघर जिल्ह्यात प्रयोगशाळा अस्तित्वात नाही. जिल्ह्यात प्रयोगशाळा मंजूर करणे आवश्यक आहे. जेणेकरुन कोळंबीवरील रोगामुळे नुकसान टाळता येईल.-शशिकांत बारी, कोळंबी उत्पादकव्हाईट स्पॉट हा आजार कवचधारी प्राण्यांमध्ये दिसून येतो. व्हाईट स्पॉटमुळे मांस आणि कवच यामध्ये ठिसूळपणा जाणवतो. पाण्यातून किंवा अन्य बाह्य परिणामांमुळे हा संसर्ग पसरतो. त्याची वेळोवेळी दक्षता घेत गेल्यास नुकसान टाळता येते.-पूजा साळवी, एएफडीओ,फिशरीज विभाग