शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
2
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
3
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
4
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
5
बगराम तळावरून सुरु झाला नवा संघर्ष? डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीवर तालिबानचे प्रत्युत्तर
6
शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex ४७५ अंकानी आपटला; Nifty मध्येही घसरण, IT शेअर्समध्ये जोरदार विक्री
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर नवदुर्गा कृपा, पद-पैसा-लाभ; अकल्पनीय यश, अनपेक्षित भरभराट!
8
"आता जे गरजेचं ते करावंच लागेल"; सरसंघचालक भागवत अमेरिकेच्या टॅरिफ आणि 'एच१ बी'बद्दल स्पष्टच बोलले 
9
Mumbai: गावी जाण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्यानं पत्नीची हत्या; कांदिवली येथील घटना!
10
देवोलिना भट्टाचार्जी पुन्हा प्रेग्नंट? फोटोशूटवरुन चर्चांना उधाण; ९ महिन्यांपूर्वीच दिला मुलाला जन्म
11
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
12
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
13
पाकिस्तानच्या नाकी नऊ आणणाऱ्या अभिषेक शर्माचा नावावर विश्वविक्रमाची नोंद, युवराजलाही टाकले मागे
14
GST कपातीनंतर आता कोणत्या वस्तूंवर सर्वाधिक टॅक्स?; यादी वाचा, अन्यथा खिशाला बसेल झळ
15
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते 'मिशन शक्ती ५.०'चा शुभारंभ; महिला सुरक्षेवर भर, पोलिसांत महिलांचा सहभाग वाढला!
16
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
17
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
18
'दशावतार'चे १० दिवस, कमावले 'इतके' कोटी, एकूण कमाईचा आकडा वाचून वाटेल अभिमान
19
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
20
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या

पालघर जिल्ह्यात उत्स्फूर्त बंद, रेल रोको, पुलवामा हल्ल्याचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 04:38 IST

रास्ता रोकोही झालेत, रॅली, अभिवादन सभांचे आयोजन : पोलिसांचा सौम्य लाठीमार, वसई एक्स्पो उद्घाटन स्थगित

नालासोपारा : दहशतवादी हल्ल्याचा निषेधार्थ वसईत दुकाने बंद, रिक्षा बंद, निषेध मोर्चा, सभा, श्रद्धाजली अर्पण करत आपला निषेध व्यक्त केला.सोबत आज सकाळी ३० हजाराहून अधिक प्रवाशांनी रेल रोको केला. काश्मिरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्लाचा तीव्र निषेध करण्यासाठी वसईत सकाळ पासून उत्स्फूर्तपणे कडकडीत बंद पाळण्यात आला, यात दुकाने, हॉटेल, रिक्षा बंद ठेवण्यात आली होते तर काही शाळांना सुट्ट्या लवकर देण्यात आल्या तर काही शाळा बंद करण्यात आल्या होत्या.जागो जागी निषेध मोर्चा काढण्यात आले होते. यात सर्व, सामाजिक कार्यकर्ते, शाळकरी विद्यार्थी, व्यापारी, दुकान चालक, सर्व रिक्षा चालक यांनी सहभाग घेत आपला निषेध व्यक्त केला. यावेळी पाकिस्थान विरोधात घोषणा बाजी देत शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली आणि या भ्याड हल्ल्याचे पाकिस्थान आण िदहशतवादीना चोख उत्तर देण्याची मागणी यावेळी नागरिकांनी केली नालासोपारा-वसई व विरार शहर परिसरातील दुकाने, रिक्षा देखील बंद असल्याने कामावर जाणारे नागरिक आज घरीच थांबून होते, नागरिकांनी स्वत:हून एक दिवसीय बंद पाळला आहे. आतंकवाद्यांना आधी गोळ्या घाला अशी संतप्त प्रतिक्रि या नागरिकांतून उमटत आहेत.

चौथ्या वसई इंडस्ट्रीयल एक्सपो २०१९चे उद्घाटन रद्दवसई पूर्व औद्योगिक वसाहतीतही उर्फूर्तपणे बंद पाळण्यात आला.नवघर औद्योगिक वसाहत,वालीव,सातीवली,गवराईपाडा,धुमाळनगर परिसर बंद करण्यात आला होता.शनिवारी सकाळी नवजीवन, आप्पा ग्राऊंडवर चौथा वसई इंडस्ट्रीयल एक्सपो २०१९ प्रदर्शन आयोजीत करण्यात आले होते .हे प्रदर्शनही आयोजकांकडून रद्द करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.त्याचे उद्घाटन रविवार १७फेब्रूवारी रोजी होणार असून ते १७ ते १९ फेब्रूवारी २०१९ पर्यंत सुरू रहाणार आहे.

बोईसरला उत्स्फूर्तपणे बंदबोईसर: काश्मिरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानावर अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्याकरिता शनिवारी बोईसरला उत्स्फूर्तपणे बंद पाळण्यात आला. मात्र एसटी सुरळीत सुरू होती म्हणून प्रवाशांनी आज एसटीचा आधार घेतला. विशेष म्हणजे आजच्या बंद करीता सकाळी फारसे कुणीही आक्र मकपणे रस्त्यावर उतरले नव्हते.बोईसर व चित्रालय मधील मोठ्या बाजारपेठा, भाजी व मच्छी मार्केट, हॉटेल्स, काही शाळा, सहा व तीन आसनी रिक्षा पूर्णपणे बंद मध्ये सहभागी झाले होते. तर तारापूर एमआयडीसी मधील कारखाने व बोईसर मधील बँका व विमा तसेच पोस्ट कार्यालय नियमित सुरू होते. भीमनगर, ओस्तवाल येथे टायर व अतिरेक्यांचे प्रतिकात्मक पुतळे जाळून निषेध व्यक्त करण्यात आला. त्यावेळी काही वेळाकरिता वाहतूक ठप्प झाली होती. तर सर्वत्र पाकिस्तान विरोधात संताप सर्वत्र निषेध व्यक्त करण्यात येत होता. रेल्वेगाड्याही काही वेळाकरिता ठिकठिकाणच्या स्थानकावर ठप्प झाल्या होत्या म्हणून चाकरमान्यांना अर्ध्या वाटेवरूनच परतावे लागले.कुडूसला आंदोलनकुडूस : येथे पाकिस्तान मुर्दाबादच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या. भारतीय लष्कराचे जवान बेसावध असताना त्यांच्यावर पाकिस्तानी अतिरेक्यांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात ४४ जवान शहीद झाले तर अनेक जवान जखमी झाले आहेत. त्याचा निषेध म्हणून व्यापारी संघटना व कुडूस ग्रामपंचायत यांच्या विदयमाने शनिवारी दि. १६) कुडूस नाक्यावर पाकिस्तान विरोधी घोषणा देण्यात आल्या. यावेळी दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी कुडूस व्यापारी संघटनेचे सचिव तथा सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत भोईर, नॅशनल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मुस्तफा मेमन, कुडूसचे उपसरपंच डॉ. गिरीश चौधरी, सुनिल जाधव, हर्षल देसले यांनी हल्ल्याचा निषेध नोंदवून पाकिस्तानला धडा शिकवा अशी मागणी सरकारकडे केली.या निषेध कार्यक्र मात कुडूसचे माजी उपसरपंच इरफान सुसे, अल्लारख मेमन, डॉ. वसंत हिरवे, राजेंद्र शेटे आदींसह व्यापारी, विद्यार्थी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.वाड्यात निघाली रॅलीवाडा : शहरातून निघालेल्या या रॅलीमध्ये दहशतवादी हल्ल्याचा निषेध करून पाकिस्तान मुर्दाबाद, हिंदुस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या. श्रद्धांजली कार्यक्रमा दरम्यान वाडा मशिदीचे इमाम इकबाल भाभे म्हणाले कि आम्ही या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत असून इस्लाम अशी शिकवण कधीच देत नाही. सरकारने या दहशतवाद्यांना थारा देणाऱ्या पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावे अशी मागणीही यावेळी केली.या रॅलीला व श्रद्धांजली कार्यक्र माप्रसंगी सरफराज धांगे, मंसूर शेख, आमीन सेंदु, फिरोज शेख, नगरसेवक विसम शेख, फैसल कोतकर, साहिल खतीब आदींसह शेकडो मुस्लिम बांधव उपस्थित होते.जव्हारला बंद आणि रॅलीजव्हार: यावेळी मोठ्या संख्यने जव्हारकर उपस्थित होते, शिवसेनेच्यावतीने पुकारलेल्या बंदला यशस्वी करीत जव्हारच्या व्यापारीनी पूर्णपणे प्रतिसाद दिला.व्यापारी वर्गाने सकाळपासून आपआपले व्यवहार बंद ठेवून दुपारी गांधी चौक येथे झालेल्या श्रद्धांजली कार्यक्रमात मोठया संख्येने हजेरी लावून भारतीय एकात्मतेचा दर्शन घडवले, यावेळी सर्वपक्षीय व हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भ्याड हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या जवानांना प्रत्येक शाळांना सुद्धा श्रद्धांजली वाहिली. तसेच गांधीचौक येथे भ्याड हल्लेच्या निषेधाचे बॅनर लावण्यात आले. काहींनी पाकविरोधात घोषणा दिल्या.तारापूरला श्रद्धांजलीतारापूर : टीमाचे अध्यक्ष डी. के.राऊत, पापा ठाकूर, वेलजी गोगरी, जगन्नाथ भंडारी, एम.आर.गुप्ता, संदीप सावे, बजाज, अर्चना वाणी, अग्निशमन अधिकारी परब व अंभुरे, एमपीसीबीचे अधिकारी मनीष होळकर, महावितरणचे अधिकारी राठोड, टीमाचे सर्व कमेटी सदस्य व जे एस डब्ल्यू स्टीलचे वरिष्ठ अधिकारी बबन जाधव इत्यादीनी शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली.या वेळी राऊत यांनी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करुन या अतिरेक्यांना व पाकिस्तानला योग्य धडा शिकवण्याची वेळ आली आहे याप्रसंगी पापा ठाकूर वेलजी गोगरी, जगन्नाथ भंडारी, अर्चना वाली यांनीही आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.मोखाड्यात निघाली रॅलीमोखाडा : येथे निघालेल्या रॅलीत मोठ्या प्रमाणत हिंदू मुस्लिम बौद्ध बांधव सहभागी झाले होते. काँग्रेस पक्षाच्यावतीने निवेदन देऊन शहीदांच्या कुटुंबियांना सरकारी नोकरीत सामावून घेणे व त्यांच्या कुटुंबियांना मदत करावी अशी मागणी तहसीलदारांकडे करण्यात आली.रेल्वे पाच तास ठप्पच्वसई : काश्मीर येथील पुलवामा येथे झालेल्या सीआरपीएफच्या जवानांवरील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ वसई तालुक्यात शनिवारी उत्स्फूर्तपणे बंद पाळण्यात आला. सकाळी आठ वाजल्यापासून नालासोपारा येथे नागरिकांनी ट्रॅकवर उतरून लोकल बंद केल्या. पाच तास हा रेलरोको सुरू होता. दुपारी एक नंतर विरारहून धिम्यागतीने रेल्वे वाहतूक सुरू करण्यात आली. वसई पूर्व औद्योगिक वसाहतीतही बंद झाला.च्नवघर औद्योगिक वसाहत, वालीव, सातीवली,गवराईपाडा,धुमाळनगर परिसर बंद करण्यात आला होता. शनिवारी सकाळी नवजीवन, आप्पा ग्राऊंडवर चौथ्या वसई इंडस्ट्रीयल एक्स्पो२०१९ चे आयोजन करण्यात आले होते. हे प्रदर्शनही आयोजकांकडून रद्द करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. त्याचे उद्घाटन आता रविवारी १७ फेब्रुवारी रोजीहोणार असून ते १७ ते१९ फेब्रुवारी २०१९ पर्यंत सुरू रहाणार आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला