शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

जखमींवर आता तत्काळ उपचार

By admin | Updated: September 11, 2014 01:28 IST

रेल्वेच्या विविध अपघातांत अनेक प्रवासी मोठ्या प्रमाणात जखमी होतात. अशा जखमी प्रवाशांसाठी तत्काळ रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही

मुंबई : रेल्वेच्या विविध अपघातांत अनेक प्रवासी मोठ्या प्रमाणात जखमी होतात. अशा जखमी प्रवाशांसाठी तत्काळ रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही आणि त्यांना मृत्यूलाही सामोरे जावे लागते. मात्र अशा जखमींना तत्काळ रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी म्हणून सरकारी कोट्यातील मध्य रेल्वेच्या अठरा आणि पश्चिम रेल्वेच्या २८ स्थानकांवर रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आल्या आहेत. मात्र ठाणे आणि विरारपुढील स्थानके या रुग्णवाहिकांपासून वंचित राहिली असून त्या स्थानकांवरही लवकरात लवकर रुग्णवाहिका उपलब्ध केली जाणार आहे. दिवा-सावंतवाडी पॅसेंजरला मोठा अपघात झाला आणि जखमींना नेण्यासाठी खासगी रुग्णवाहिकेचा वापर करावा लागला. या घटनेत रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध न झाल्याने आणि खासगी रुग्णवाहिकांचा वापर करावा लागल्याने रेल्वे प्रशासन आणि राज्य सरकारच्या कारभाराबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले. या अपघाताबरोबरच मुंबई शहर आणि उपनगरात असणाऱ्या रेल्वे स्थानकांचीही हीच गत असून अनेक स्थानकांवर रुग्णवाहिका नसल्याने जखमी प्रवाशांना खासगी रुग्णवाहिकेवरच अवलंबून राहावे लागत होते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाची चांगलीच पंचाईत होत होती. मात्र रेल्वेचे हे टेन्शन निघून गेले असून सरकारकडून रुग्णवाहिका पुरवण्यात आल्या आहेत. राज्यभरातील रेल्वे स्थानके, सरकारी रुग्णालये यांच्यासाठी राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वीच ४०० रुग्णवाहिका विकत घेतल्या. यापैकी १८ रुग्णवाहिका मध्य रेल्वेवरील स्थानकांसाठी तर २८ रुग्णवाहिका पश्चिम रेल्वेवरील स्थानकांसाठी देण्यात येणार असल्याचे जाहीर झाले. (प्रतिनिधी)