शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
8
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
10
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
11
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
12
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
13
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
14
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
15
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
17
Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
18
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
19
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
20
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
Daily Top 2Weekly Top 5

जव्हार जिल्हा निर्मितीचे कागदी घोडे हलू लागले

By admin | Updated: August 18, 2015 00:20 IST

राज्य सरकारने नव्याने आणखी २२ जिल्हे व ४९ तालुके निर्माण करण्यासंदर्भात पावले उचलली असल्याची चर्चा मंत्रालयात सुरु असल्याची माहिती जिल्ह्यात धडकल्याने पुन्हा एकदा

वसई : राज्य सरकारने नव्याने आणखी २२ जिल्हे व ४९ तालुके निर्माण करण्यासंदर्भात पावले उचलली असल्याची चर्चा मंत्रालयात सुरु असल्याची माहिती जिल्ह्यात धडकल्याने पुन्हा एकदा जिल्हा विभाजनाच्या चर्चेला वेग आला आहे. या मध्ये पालघर जिल्ह्यातील जव्हार हा भाग वेगळाकरून हा नवा जिल्हा निर्माण करण्याची योजना विचाराधीन आहे, अशी माहिती आहे. अजून तरी हे सर्व कागदी घोड्यांच्याच स्वरुपात असले तरी, त्याचे पडसाद आता सर्वत्र उमटू लागले आहेत. अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी हा आततायीपणाचा प्रकार असल्याचे सांगितले तर काही संस्था व उद्योजकांनी युती सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.या प्रस्तावानुसार पालघर जिल्ह्यातील जव्हार वेगळे करून नवीन जिल्हा निर्माण करण्याचा प्रस्ताव असून या संदर्भात राज्य सरकार आमदारांचे मनोगत जाणून घेत आहे. गेल्यावर्षी ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन नव्याने पालघर जिल्हा अस्तित्वात आला. त्यावेळी अनेक नागरीकांनी तसेच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी ठाणे जिल्ह्याचे डोंगरी, सागरी, व नागरी असे तीन जिल्हे करण्यात यावेत अशी मागणी केली होती. परंतु तत्कालीन आघाडी सरकारने या मागणीचा विचार न करता सरसकट विभाजन करून पालघर जिल्हा निर्माण केला. (प्रतिनिधी)