शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

शासनाचे कर्ज फेडायचे तरी कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 00:05 IST

बोट समुद्रात बुडाली : तांडेल यांचा सवाल

हितेन नाईक।लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : मत्स्य दुष्काळ आणि वाढती महागाई यामुळे शासनाकडून बोट बांधणीसाठी घेतलेल्या कर्जाचे हफ्ता भरणे शक्य नाही, त्यातच भाड्याने उत्तन येथे दिलेली ‘साई लक्ष्मी’ ही बोटही समुद्रात बुडाल्याने मालक अनिल काशीनाथ तांडेल यांच्यावर कर्जाचा मोठा बोजा चढला असून हे लाखो रुपयांचे कर्ज फेडायचे कसे या विवंचनेत मालक सापडला असून आपल्यावर आत्महत्येची पाळी ओढवल्याने शासनाने आपले पुनर्वसन करावे, अशी मागणी तांडेल यांनी केली आहे. दरम्यान, शासनाच्या २०१५ च्या शासन निर्णयाप्रमाणे नैसर्गिक आपत्ती दरम्यान बोटीचे संपूर्ण नुकसान झाल्यास बोट मालकाला अवघे ९ हजार ६०० रुपयांच्या नुकसान भरपाईचे प्रयोजन आहे. इथे ३० ते ४० लाखाच्या रक्कमेची बोट आणि साहित्य असे नुकसान झाले असताना शासनाने आपल्यावरील कर्जाची रक्कम माफ करून पुनर्वसनाचा प्रस्ताव मान्य करावा, अशी मागणीही तांडेल यांनी शासनाकडे केली आहे.

सातपाटी येथे राहणारे अनिल काशीनाथ तांडेल यांनी शासनाच्या एनसीडीसी योजनेअंतर्गत २००७ मध्ये ११ लाख ५२ हजार १०० रुपयाांचे कर्ज घेतले. एकूण ९६ हप्त्यात दरमहा १२ हजार रु पये ८ वर्षात भरण्याची अट त्यांना घालण्यात आली होती. बोटीला मासेच मिळत नसतानाही खलाशांचा वाढलेला पगार, डिझेल, जाळी, दोरखंड, बर्फाचे वाढते दर आदी बाबीमुळे खर्च आणि उत्पन्न याचा मेळ बसत नसतानाही त्यांनी मत्स्य व्यवसाय विभागाकडे २ लाख ४४ हजार ९५३ रुपयांची रक्कम भरणा केली. त्यानंतर त्यांनी काही महिने आपली बोट बंदही ठेवली. त्यांच्या कर्जातील ९ लाख ७ हजार १४७ रु पयांची थकबाकी आणि भाग भांडवलाची ६ लाख २८ हजार ५०० अशी एकूण १५ लाख ३५ हजार ६४७ हजाराची निव्वळ थकबाकी बोट मालक अनिल तांडेल यांच्यावर असल्याची माहिती सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त अजिंक्य पाटील यांनी लोकमतला दिली. स्वत: पाटील यांनी आपल्या गस्ती नौकेद्वारे समुद्रात ३३ वाव खोल पाण्यात घटनास्थळी भेट देत पाहणी केली. आपदग्रस्त मच्छीमारांना शासनाच्या निर्देशानुसार योग्य ती कार्यवाही करू असेही त्यांनी सांगितले. १६ डिसेंबर रोजी ही बोट उत्तनच्या समोर समुद्रात मासेमारी करीत असताना वादळी वारे आणि महाकाय लाटेच्या तडाख्याने उलटली. तेव्हा ही बोट भाड्याने देण्यात आली होती. बोटीत असलेल्या तांडेल विजय बगाजी आणि विक्रमगडच्या दादडे पाड्यावरील १० आदिवासी खलाशी कामगारांनी समुद्रात उड्या घेतल्या.८ - १० लाखांचे नुकसानच्दुर्घटनेनंतर बोटीतील लाखो रुपयांची जाळी, ४०० लिटर्स डिझेल, ४५ हजाराचा वायरलेस सेट, ४० हजाराच्या बॅटऱ्या तसेच दुर्घटनाग्रस्त बोट आणण्यासाठी समुद्रात पाठविलेल्या बोटीच्या डिझेलचा दीड लाख खर्च असा सुमारे ८ ते १० लाखाच्या साहित्याचे नुकसान झाल्याची माहिती संगीता बगाजी यांनी लोकमतला दिली.शासनाने २०१७-१८ साली काढलेल्या नवीन शासन आदेशाप्रमाणे आपद्ग्रस्तमच्छीमारांचे सर्व कर्ज माफ करून त्याचे पुनर्वसन करावे.- राजन मेहेर, अध्यक्ष,सातपाटी मच्छिमार सहकारी संस्था