शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

...अन् अचानक कूपनलिकेतून येऊ लागलं गरम पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 23:29 IST

तीन महिन्यांत घटनेची पुनरावृत्ती; नागरिकांमध्ये कुतूहल

- अनिरुद्ध पाटीलडहाणू /बोर्डी : चिखले केंद्र शाळेच्या आवारातील कूपनलिकेतून शनिवार, २८ डिसेंबर रोजी सकाळी गरम पाणी येण्यास प्रारंभ झाला असून हा चमत्कार पाहण्यासाठी रविवारी दिवसभर नागरिकांनी गर्दी केली. दरम्यान, डहाणू तहसीलदार राहुल सारंग, गटविकास अधिकारी बी.एच. भरक्षे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाणी नमुने तपासणीकरिता पाठवले आहेत. मागील तीन महिन्याच्या कालावधीत ही दुसऱ्यांदा पुनरावृत्ती असून नागरिकांमध्ये कुतूहल व्यक्त होत आहे.या कूपनलिकेतून गरम पाणी निघत असल्याचा अनुभव शनिवारी सकाळी काही ग्रामस्थांना आला होता. मात्र सायंकाळपासून हा चमत्कार पाहण्यासाठी गर्दी वाढू लागली, ती रविवारी पूर्ण दिवस होती. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सूचना फलक लावण्यात आला. दरम्यान, रविवारी दुपारी दीडच्या सुमारास डहाणू तहसीलदार राहुल सारंग, गटविकास अधिकारी बी.एच. भरक्षे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर पाणी नमुने गोळा करण्यासह, भूगर्भ तसेच जिल्हा आपत्ती विभागाला प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे. त्यांनी नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे.फेब्रुवारी २०१३ रोजी ही कूपनलिका खोदून, त्यावर हँडपंप तसेच विद्युत मोटारही बसविण्यात आली आहे. या विद्युत पुरवठ्याचा आणि पाणी गरम होण्याचा कोणताही संबंध नसल्याची बाब वाडा तालुक्यातील घटनेतूनही समोर आली आहे. त्यामुळे भूगर्भातील हालचालींमुळे हा प्रकार घडल्याचा अंदाज व्यक्त होत असून त्याचा थेट संबंध या तालुक्यात मागील वर्षभरापासून बसणाºया भूकंपाच्या धक्क्यांशी जोडला जात आहे. शिवाय तालुक्यात एकूण बसलेल्या ५९ धक्क्यांच्या नोंदी पाहता, ४ रिस्टर स्केल तीव्रतेचा टप्पा गाठला आहे. त्यामुळे हा भूकंपाने निर्माण झालेला बदल आहे का? याबद्दल कुतूहल वाढत असून हे तपासण्याची गरज व्यक्त होत आहे.या प्रकाराबाबत भूगर्भ विभालाला कळविण्यासह, पाण्याचे नमुने तपासण्यास पाठविले आहे. योग्य माहिती हाती आल्यावर कारण स्पष्ट होईल. नागरिकांनी घाबरू नये.- राहुल सारंग, तहसीलदार, डहाणूहाताला चटके बसेल एवढं पाणी गरम असून त्या पाण्याचे नमुने घेतले आहेत. विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी हे पाणी पिऊ नये, त्याऐवजी पर्यार्यीपाणी उपलब्ध केले जाईल.-बी. एच. भरक्षे, गटविकास अधिकारी, डहाणूया कूपनलिकेला गरम पाणी येत असल्याने हा अनुभव नागरिक प्रत्यक्ष घेत असून कुतूहलाचा अनुभव घेत आहोत.- शैलेश गोंधळेकर/ संतोष तांडेल,चिखले ग्रामस्थ.