शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

महामार्ग पोलीसांकडून पिळवणूक

By admin | Updated: March 1, 2016 02:00 IST

मुंबई अहमदाबाद महामार्गावर चारोटी, खानीवडे टोलनाक्यांवर, धानीवरी चढणीवर महामार्ग वाहतूक पोलीसांकडून पहाटे अथवा रात्रीच्या वेळी अवजड वाहनाची अडवणूक केली जाते आहे

डहाणू : मुंबई अहमदाबाद महामार्गावर चारोटी, खानीवडे टोलनाक्यांवर, धानीवरी चढणीवर महामार्ग वाहतूक पोलीसांकडून पहाटे अथवा रात्रीच्या वेळी अवजड वाहनाची अडवणूक केली जाते आहे. त्यामुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. पैसे गोळा करण्यात दंग असलेले हेच वाहतूक पोलीस महामार्गावर अपघात घडल्यास मात्र वेळेत पोहोचत नसल्याचा आरोपही वाहतूकदारांनी केला आहे. खरे तर गुजरातहुन महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनांची दापचरी सीमा तपासणी नाक्यावर अत्याधुनिक पद्धतीने तपासणी केली जाते. त्यामुळे पुन्हा काही अंतरावर. वाहतूक पोलीसांनी तपासणी करण्याची आवश्यकता नाही. ही तपासणी नसून नाहक अडवणूक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.मुंबई अहमदाबाद हायवेवर गुजरातहून तसेच दादरा नगर हवेली येथून मुंबईला जाण्यासाठी तसेच सुट्टीच्या कालावधीत गावी जाऊ इच्छिणाऱ्या हायवेने जावे लागते. परगावाहून आलेले प्रवासीही उतरून हायवेने मिळेल त्या वाहनाने इच्छीत स्थळी जात असतात. वाहनांना अडवून ठराविक रकमेची मागणी महामार्ग पोलीस करीत असल्याचे एका वाहनचालकाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगीतले. अवाजवी रक्कम मागितली जाण्यामुळे प्रवाशांची कुचंबणा होत असून कुटुंबकबिल्यासह रात्रीअपरात्री तिष्ठत उभे राहण्यापेक्षा मागितली ती रक्कम देऊन इच्छित स्थळी जाणे भाग पडत असल्याच्या तक्रारी वाहनचालक करीत आहेत.