शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

येथे होतात जीवघेणे उपचाऱ़़!

By admin | Updated: August 18, 2015 00:23 IST

इमारतीच्या चहुबाजूंनी उगवलेली रोपटी, त्यात इमारतीच्या आतील भागाला गेलेले तडे, त्यातून सुरू असलेली गळती, अशा दयनीय अवस्थेत मुलुंडचे कामगार रुग्णालय सध्या

मनीषा म्हात्रे, मुंबईइमारतीच्या चहुबाजूंनी उगवलेली रोपटी, त्यात इमारतीच्या आतील भागाला गेलेले तडे, त्यातून सुरू असलेली गळती, अशा दयनीय अवस्थेत मुलुंडचे कामगार रुग्णालय सध्या शेवटच्या घटका मोजत आहे. त्यातही अशा जीवघेणा उपचार केंद्रात रुग्णांना औषधांसाठी रुग्णालयाबाहेर जाण्याशिवाय अन्य पर्याय नसतो. पूर्व आणि मध्य उपनगरांतील कामगारांसाठी मुलुंड एलबीएस रोडवरील कामगार रुग्णालय हा एकमेव आधार आहे. या रुग्णालयामुळे कामगारांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला. दिवसाला शेकडो रुग्ण या रुग्णालयात उपचारासाठी यायचे. रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळील शेड कधीही कोसळू शकते. त्यामुळे पहारा देणारे सुरक्षारक्षकही जीव मुठीत धरून येथे ड्युटी करतात. इमारतीच्या भिंतीमध्ये चहूबाजूंनी रोपटी उगवल्याने बराचसा भाग कोसळू लागला आहे. त्यात इमारतीच्या आतील अनेक भिंतींना तडे गेले आहेत. यात प्रसूती वॉर्डची अवस्था फारच दयनीय आहे. येथे दाखल होणाऱ्या महिलांसह त्यांच्या कुटुंबीयांसाठी एकेक दिवस जीवघेणा ठरत असल्याचे रुग्णांच्या नातेवाइकांचे म्हणणे आहे. रुग्णांच्या खाटेशेजारी सुरू असलेली गळती, तसेच येथील शौचालयेही कोसळण्याच्या स्थितीत आहेत. अनेकदा येथील स्लॅबच्या काही भागांची पडझड होत असल्याचे रुग्णांचे म्हणणे आहे. त्यात चार लिफ्टपैकी एक लिफ्ट बंद असल्याने त्याचाही फटका रुग्ण आणि कर्मचाऱ्यांना बसतो. अशा परिस्थितीमुळे काही वॉर्र्ड बंदही करण्यात आले होते. दोन शस्त्रक्रिया विभागांपैकी एक विभाग बंद असून, त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. औषधांसाठी रुग्णालयाबाहेर जाण्याशिवाय अन्य पर्याय नसल्याचे काही रुग्णांनी ‘लोकमत’ला सांगितले. त्यात कर्मचारीवर्गावर अतिरिक्त भार आहे. त्यात परिचारिका, कक्षसेवक, कक्षसेविका, प्रयोगतंत्रज्ञांचा तुटवडा असल्याने एकावेळी एका परिचारिकेवर तीन वॉर्ड सांभाळण्याची वेळ ओढावते. अशात पाच ते सहा कक्षसेवकांचे काम एकावर पडत असल्याने त्यांची यामध्ये मोठ्या प्रमाणात घुसमट होताना दिसते. त्यामुळे रुग्णांबरोबर याचा फटका कर्मचारीवर्गाला बसत असत असल्याचे तेथील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. अशात पदोन्नती, पेन्शनच्या पैशांसाठी कर्मचाऱ्यांना वर्षानुवर्षे पायपीट करावी लागते.