शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

पालघरसह वसई-विरारमध्ये मुसळधार पावसाचे थैमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 00:21 IST

विजेचा लपंडाव : वसईत ४० झाडे कोसळल्याच्या घटना

लोकमत न्यूज नेटवर्कपालघर/पारोळ : अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर धडकलेल्या निसर्ग चक्रीवादळाचा पालघर जिल्ह्याला सर्वात मोठा धोका होता. मात्र हे वादळ पालघरच्या पश्चिम किनारपट्टीवर धडकलेच नसल्याने येथील नागरिकांचे होऊ पाहणारे संभाव्य नुकसान टळले. या वादळाशी दोन हात करण्यासाठी पालघर जिल्हा प्रशासनाने वेळीच खबरदारी घेतली होती. दरम्यान, वादळ शमले असले तरी गुरुवारी सकाळपासूनच वसईत मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. अनेक सखल परिसरात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. तर खबरदारी म्हणून वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता.बुधवारपासूनच ग्रामीण व शहरी भागात चक्रीवादळाच्या भीतीने विद्युतपुरवठा खंडित करण्यात आला होता, तर ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरू होता. वादळामुळे वसई तालुक्यात फारसे नुकसान झाले नसले तरी काही भागात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे बुधवारी दुपारपासून ते गुरुवारी संध्याकाळपर्यंत ४० ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या. गुरुवारी दुपारनंतर पावसाची रिपरिप सुरू होती. दरम्यान, राज्यात अद्याप मान्सूनचे आगमन होणे बाकी आहे. त्यामुळे आत्ताचा पाऊस हा चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पडल्याची जाणीव शेतकऱ्यांना आहे. साहजिकच जोवर मृगाचा पाऊस कोसळत नाही तोवर शेतकरी नांगर धरणार नाहीत.यंदा कोरोनाच्या आपत्तीबरोबरच नैसर्गिक आपत्तीलाही शेतकºयांना तोंड द्यावे लागणार आहे. सोशल डिस्टन्सिंग, संचारबंदी असल्याने बºयाचशा शेतकºयांना यंदा शेतीकामासाठी मजूर मिळण्याची शक्यता कमी आहे. साहजिकच, कोरोनाचा यंदा शेती उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.