शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

बसेस भंगारात विकून दिला कर्मचाऱ्यांचा अर्धा पगार

By admin | Updated: September 19, 2015 23:36 IST

पालिकेच्या स्थानिक परिवहन सेवेची अवस्था अत्यंत दयनीय झाल्याने गेल्या काही महिन्यांपासून कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी पैसे नसल्यामुळे सेवेतील सहा बसेस भंगारात

भार्इंदर : पालिकेच्या स्थानिक परिवहन सेवेची अवस्था अत्यंत दयनीय झाल्याने गेल्या काही महिन्यांपासून कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी पैसे नसल्यामुळे सेवेतील सहा बसेस भंगारात विकून ठेकेदाराने कर्मचाऱ्यांचा आॅगस्ट महिन्याचा अर्धा पगार भागविला आहे. २०१० मध्ये पब्लिक अ‍ॅण्ड प्रायव्हेट पार्टनरशिप तत्त्वावर सुरू झालेली स्थानिक परिवहन सेवा पालिकेने करारानुसार सुविधा न पुरविल्याने तोट्यात चालल्याची ओरड ठेकेदार मे. केस्ट्रल इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. कंपनीकडून सुरू आहे. यामुळे सुरुवातीला १०२ बसेसद्वारे सुरू झालेली सेवा आजमितीस २५ ते ३० बसेसवर आली आहे. सततचा तोटा भरून काढण्यासह जुन्या बस रस्त्यावर धावण्यासाठी तंदुरुस्त नसल्याने मे २०१२ मध्ये ठेकेदाराने ५० बस भंगारात विकल्या होत्या. या सेवेत सुमारे ४५० कर्मचारी कार्यरत असून दररोजच्या अल्प उत्पन्नामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारावर ठेकेदाराने गदा आणण्यास सुरुवात केली आहे. तसेच त्यांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कमही त्याने अद्याप जमा केली नसली तरी त्याची कार्यवाही सुरू केल्यानंतरही कर्मचाऱ्यांनी त्याचे अर्ज अद्याप सादर केले नसल्याचे कंपनीने सांगितले आहे. त्यामुळे जुलै महिन्याचा पगार देण्यास टाळाटाळ होऊ लागल्याने कर्मचाऱ्यांनी राजकीय मध्यस्थीतून पगाराची समस्या तूर्तास मार्गी लावली असताना आॅगस्ट महिन्याच्या पगाराची पुन्हा बोंब होऊ लागली. सध्या सुरू झालेल्या गणेशोत्सवातही अनेक कर्मचाऱ्यांना वेतनाअभावी उत्सव साजरा करण्याची पाळी आली असतानाच पुन्हा राजकीय व प्रशासकीय मंडळींकडे धाव घ्यावी लागू नये, म्हणून सहा बस भंगारात मुंब्रा येथील एकाला विकून १२ लाख रु. रकमेतून ठेकेदाराने कर्मचाऱ्यांचा आॅगस्ट महिन्याचा अर्धा पगार भागविला आहे. यामुळे रस्त्यावर धावणाऱ्या बसेसची संख्या तुटपुंजी झाल्याने शहरांतर्गत प्रवाशांसाठीसुद्धा ही सेवा असमाधानकारक ठरली आहे. याबाबत, मे. केस्ट्रल कंपनीचे संचालक राजा गेमनानी यांनी सांगितले की, यात कोणतेही तथ्य नसून यामागे केवळ अफवा आहे. कर्मचाऱ्यांना थकीत भविष्य निर्वाह निधी जमा करण्यासाठी अनेकदा अर्ज भरण्याच्या सूचना दिल्यानंतरही त्यांनी ते अद्याप सादर केलेले नाहीत. त्यामुळेच त्यांचे वेतन रोखले होते.