शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

वनवासी गावातील गोवरी पोहोचली नाशिकच्या बाजारात; स्थानिक महिलांना मिळाला रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 02:16 IST

एका महिलेला एक गोवरी तयार करण्याचे सहा रुपये दिले जातात. एक महिला साधारण ५० गोवऱ्या दिवसाला तयार करते

हुसेन मेमनजव्हार : श्री गुरुजी रुग्णालय नाशिक संचालित सेवा संकल्प समितीअंतर्गत अदिवासी पाड्यांवर ग्रामीण भागात उपलब्ध असलेले पशुधन आणि त्यापासून मिळणारे शेण एकत्र करून त्यापासून एक विशिष्ट साचा वापरून होळी सणासाठी व इतर वेळी उपयोगात येणाऱ्या गोवऱ्या तयार करण्याचा एक आगळावेगळा उपक्रम जव्हार तालुक्यातील वनवासी या गावात सुरू करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील आदिवासी महिलांना या कामातून रोजगार उपलब्ध झाला आहे. 

वनवासी गावात पशुधन मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने श्री गुरुजी रुग्णालय नाशिकच्या सेवा संकल्प समितीच्या माध्यमातून या गावातील ४५  आदिवासी महिलांना एक विशिष्ट प्रकारचा साचा बनवून देण्यात आला आहे. शेणाच्या गोवऱ्या कशा बनवाव्यात याबाबत प्रशिक्षणही देण्यात आले आहे. विशिष्ट आकाराचे बॉक्सदेखील देण्यात आले आहेत.

एका महिलेला एक गोवरी तयार करण्याचे सहा रुपये दिले जातात. एक महिला साधारण ५० गोवऱ्या दिवसाला तयार करते, त्यामुळे तिला दिवसभरात ३०० रुपये मजुरी मिळत आहे, अशा ४५ महिलांना दररोज जवळपास ३०० रुपये रोज कमावण्याची संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे येथील महिलांची कमाई सुरू झाली आहे. विशेष म्हणजे हा माल त्यांना बाजारात जाऊन विक्री करावा लागत नाही तर हा संपूर्ण माल संस्थेच्या वतीने विकत घेतला जातो. त्यामुळे त्यांना इतर खर्चाची मोठी बचत होत आहे. 

अदिवासी महिलांना रोजगार मिळावा हा प्रमुख उद्देश असून ही गोवरी शुद्ध देशी गाईंच्या शेणापासून बनविलेली आहे. ही गोवरी पर्यावरणाचे रक्षण करणारी असून कीटकनाशक आहे. आताच्या बदललेल्या काळात याची नितांत गरज आहे. या गोवरींची राख, खते म्हणून व इतर कारणांसाठी उपयुक्त आहे. यामुळे होळीव्यतिरिक्त इतर धार्मिक कार्यक्रम जसे की, होमहवन, अग्निहोत्र इ.साठीसुद्धा उपयोगी आहे. - डॉ. राजेंद्र खैरे, कार्यवाह  सेवा संकल्प समिती व श्रीगुरुजी रुग्णालय, नाशिक

होळीसाठी लागणाऱ्या गोवऱ्या आपल्या गावातून जात आहेत आणि ४५ महिलांना रोजगार उपलब्ध होऊन संसारासाठी काही पैसे गावात काम करून मिळणार असल्याचे खूप समाधान वाटते. - मीरा निवृत्ती गोताराने, वनवासी, रहिवासी