शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

आता ५,५०० ऐवजी फक्त ५०० रुपये भरून मिळणार गॅसलाइन; बविआच्या प्रयत्नांनी यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 01:50 IST

गॅसजोडणीसाठी अनामत रक्कम ९० टक्क्यांनी घटवल्याने दिलासा

वसई : जीवघेण्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रम राबवणाऱ्या बविआने नागरिकांना आणखी एक दिलासा दिला आहे. पालघर जिल्ह्यातील अनेक सामान्य कुटुंबांना पाईपलाईन गॅस जोडणीसाठी भरावी लागणारी साडेपाच हजार रुपयांची अनामत रक्कम थेट ९० टक्क्यांनी कमी करून घेण्यात यश मि‌ळवले आहे. 

नालासोपाराचे बविआचे आ. क्षितीज ठाकूर यांनी यासाठी प्रयत्न सुरू केले होते. अखेर या प्रयत्नांना यश आले असून आता गुजरात गॅस लि. कंपनीने ग्राहकांना आकारली जाणारी अनामत रक्कम थेट ९० टक्क्यांनी कमी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे आर्थिक कंबरडे मोडले असताना पालघर जिल्ह्यातील नागरिकांना त्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला असल्याची भा वनिक प्रतिक्रिया आ. क्षितीज ठाकूर यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली आहे.

या आधी पाईपलाईन गॅस पुरवठा करण्यासाठी गुजरात गॅस लि. ही कंपनी ५ हजार ६१८  रुपये एवढी रक्कम अनामत म्हणून घेत होती. सध्या कोरोना काळात अनेकांचे धंदे, उद्योग व एकूणच रोजगारही गेले आहेत. अनेकांच्या वेतन-पगारांमध्येही मोठी कपात करण्यात आली आहे. हातावर पोट असणाऱ्यांना तर टाळेबंदीमुळे प्रचंड संकटाचा सामना करावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर पाईपलाईन गॅससाठी साडेपाच हजार रुपयांची अनामत रक्कम भरणेही अनेकांसाठी कठीण होते. 

दि. २८ सप्टेंबर रोजी आ. क्षितीज ठाकूर यांनी गुजरात गॅस लि.च्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. ही रक्कम एक तर पूर्ण माफ करावी किंवा निदान नाममात्र रक्कम आकारण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. या बैठकीचा संदर्भ देत कंपनीचे उपाध्यक्ष नवीन शर्मा यांनी आ. ठाकूर यांना पत्र पाठवले आहे.

या गॅस कं.च्या निर्णयाबद्दल बहुजन विकास आघाडी, व्यक्तिश: मी आणि पालघर जिल्हावासी कंपनीचे आभारी असून सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता कंपनीने घेतलेला हा निर्णय खरोखरच स्तुत्य आहे. या निर्णयामुळे सामान्य माणसाला मोठा दिलासा मिळणार आहे.-  क्षितीज ठाकूर, आमदार, बविआ.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार