शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

महागाईची झळ सोसूनही गणेशोत्सव उत्साहात

By admin | Updated: September 19, 2015 21:52 IST

यंदाच्या गणेशोत्सवात गणेशभक्तांना महागाईचे चांगलेच चटके बसले. साध्या झेंडुच्या फुलापासून थेट मखरापर्यंत चढ्या भावाने साहित्य खरेदी करावे लागले. फुलाच्या दरामध्ये मनमानीपणे वाढ

- दिपक मोहिते,  वसईयंदाच्या गणेशोत्सवात गणेशभक्तांना महागाईचे चांगलेच चटके बसले. साध्या झेंडुच्या फुलापासून थेट मखरापर्यंत चढ्या भावाने साहित्य खरेदी करावे लागले. फुलाच्या दरामध्ये मनमानीपणे वाढ करण्यात आल्यामुळे नागरीक त्रस्त झाले आहेत. पूर्वी ५ रू. ला झेंडू फुलाचा वाटा मिळत होता तो आता १५ ते २० रू. वर पोहोचला आहे. दर वाढवल्यानंतरही वाट्यातील फुलाचे नग संख्येने कमी झाले आहेत. यंदा फुले, दुर्वा, हार, आंब्याची पाने इ. वस्तू खरेदी करताना गणेशभक्तांना अक्षरश: घाम फुटला. १५ रू. ला मिळणारा झेंडूच्या फुलांचा हार २५ ते ३० रू. ला खरेदी करावा लागत होता. तर १०८ दुर्वांसाठी २० रू. खर्ची पडत होते. पूर्वी ६० ते ७० रू. ला खरेदी करण्यात येणारी कंठी आता १५० रू. ला घ्यावी लागत आहे. मखराचे दरही ३०० ते ४०० रू. ने यंदा वाढले आहेत. तर आरासाचे इतर साहित्यही २० ते २५ टक्क्यांनी महागले आहे. तरीही खरेदी-विक्री व्यवहार मात्र अगदी जोशात झाले. गेल्या ८ दिवसात वसई-विरार, नालासोपारा शहरामध्ये कोट्यावधी रू. ची आर्थिक उलाढाल झाली. पदपथावर झेंडुची फुले व हार विकणाऱ्या महिला विक्रेत्यांनीही यंदा बऱ्यापैकी व्यवसाय केला. फळांच्या किंमतीही वाढल्या आहेत. महागाईची झळ बसूनही गणेशभक्तांनी बऱ्यापैकी खरेदी केली. ग्रामीण भागातील आदिवासी समाजाही पारंपारीक पद्धतीने गणेशोत्सव व गौरीपूजन साजरा करत आहे. त्यामुळे विक्रेत्यांची चंगळ आहे.