लोकमत न्यूज नेटवर्कपारोळ : माजिवली या गावात स्मशान भूमी नसल्यामुळे मृतदेहांवर अंत्यसंस्कार उघड्यावर करण्याची वेळ आली आहे. पावसाळ्यात अंत्यसंस्कार करतांना या गावातील नागरिकांना मोठी कसरत करावी लागते आहे. जनसुविधा योजनेतून या कामाचे भूमिपूजन ही झाले, पण प्रशासनाला या कामासाठी मुहूर्त सापडत नसल्याचे गावाकऱ्यांनी सांगितले.ही ग्रामपंचायत पेसा अंतर्गत येते. विकास कामांसाठी मोठा निधी ही येतो. तसेच पंचायत समितीतून जन सुविधा योजने अंतर्गत स्मशानभूमीसाठी पाच लाखाच्या निधीची तरतूद करता येते. तसेच ग्रेट एस्केप, अमित डेअरी, बर्फ कारखाना असल्याने व मोठ्या प्रमाणत बांधकाम होत असल्याने या ग्रामपंचायतीचे कराचे उत्पन्न ही मोठे आहे. तरीही स्मशान भूमी का साकारत नाही हा प्रश्न या गावातील नागरिकांना पडला आहे.
अंत्यसंस्कार उघड्यावर
By admin | Updated: May 30, 2017 05:12 IST