शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

मच्छीमारांचा मंगळवारी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 06:11 IST

आपले दुर्लक्षित किनारे,समाज सध्या शासनाच्या चर्चेत असून विकासाच्या नावाखाली मोठमोठे प्रकल्प उभारून पंचतारांकित हॉटेल्स उभारण्यासाठी

लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : आपले दुर्लक्षित किनारे,समाज सध्या शासनाच्या चर्चेत असून विकासाच्या नावाखाली मोठमोठे प्रकल्प उभारून पंचतारांकित हॉटेल्स उभारण्यासाठी आपले किनारे बड्या भांडवलदारांच्या घशात घालण्याच्या शासनाच्या धोरणाविरोधात २५ जुलै रोजी विधानभवनावर मच्छिमारांच्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने हा मोर्चा आयोजित केला असून जनजागृतीसाठी किनारपट्टीवरील सागरी जिल्ह्यातील सर्व गावे ढवळून काढण्यात आली आहेत. १० जुलैपासून डहाणू तालुक्यातील झाई गावापासून सुरुवात करण्यात येऊन डहणू, वाढवण, वरोर, चिंचणी, तारापूर, उच्छेली, दांडी, नवापूर, मुरबे, खारेकुरण, सातपाटी, वडराई, केळवे, एडवण, कोरे, दातीवरे, अर्नाळा, खोचिवडे, नायगाव, वसई पाचू बंदर, किल्ला, उत्तन, चौक, डोंगरी, पाली, गोराई, मनोरी, मालवणी, भाटी, मढ, वर्सोवा, मोरागाव, जुहूतारा, खारदांडा, माहीम, वरळी, कुलाबा, कफपरेड या मच्छीमारांच्या सर्व गावात जाऊन मच्छीमारांच्या अस्तित्वावर आलेली संकटांची व ती दूर करण्यासाठी आयोजित केलेल्या मोर्चाची माहिती देण्यात आली आहे. या प्रचार दौऱ्यात एनएफएफचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, कृती समितीचे अध्यक्ष लिओ कोलॅसो कार्याध्यक्ष रामकृष्ण तांडेल, सरचिटणीस, किरण कोळी, अशोक नाईक, अशोक आंभिरे, फिलिप मस्तान, मोरेश्वर वैती, पौर्णिमा मेहेर, उज्वला पाटील, ज्योती मेहेर, मोरेश्वर पाटील, परशुराम मेहेर, रमेश मेहेर, कुमार मेहेर, जयेश भोईर, जयश्री भांजी, रेखा किणी सहभागी झाले होते.सर्वच राजकीय नेते मच्छीमारी हा शेती समान व्यवसाय असल्याचे सांगत असले तरी शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सवलती, कर्जमाफी, अल्प व्याजदराचे कर्ज देते वेळी मात्र आपले हात आखडते घेत आहेत.