शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

माकपाचा प्रांत कार्यालयावर मोर्चा

By admin | Updated: July 21, 2015 05:00 IST

जव्हार प्रकल्पातील आश्रमशाळांची दयनीय अवस्था तसेच येथे कायमस्वरूपी शिक्षक नसल्याने शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

जव्हार : जव्हार प्रकल्पातील आश्रमशाळांची दयनीय अवस्था तसेच येथे कायमस्वरूपी शिक्षक नसल्याने शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्याविरोधात सोमवारी माकपाच्या वतीने जव्हार बस स्थानक ते गांधी चौक, यशवंतनगर असा मोर्चा काढण्यात आला. या वेळी धोधो पाऊस पडत असतानाही पालकांनी मोठी हजेरी लावली होती.जव्हार प्रकल्पातील आश्रमशाळेत अध्यापन करण्यासाठी शिक्षकांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. वांगणी शाळेत पहिली ते दहावीपर्यंत एकूण ५०३ विद्यार्थी निवासी शिक्षण घेत आहेत. परंतु तिथे मुख्याध्यापक व अधीक्षक नाहीत. त्यामुळे शाळेत मुलाला पाठवू कसे असा प्रश्न पालकांना पडला आहे. तर जव्हार, मोखाडा या तालुक्यांतील शाळांचा निकाल चांगला लागला असला तरी अनेक विद्यार्थी अकरावीच्या प्रवेशासाठी वणवण भटकत आहेत. माकपा व पालक यांच्या मोर्चादरम्यान जून महिना गेला व जुलै महिना उलटायला आला तरी पाऊस पडत नसल्याने भात, नागली, वरई, तूर, उडीद, राब सुकून गेले आहेत. त्यामुळे पंचनामा करून कोरडा दुष्काळ जाहीर करा. प्रत्येक आश्रमशाळेतील रिक्त पदे भरा, रेशनकार्डधारकांना धान्य वेळेत द्या, मजुरांना रोजगार द्या, अशा विविध मागण्या या मोर्चादरम्यान करण्यात आल्या आहेत.या वेळी मोर्चात आश्रमशाळांची परिस्थिती गंभीर आहे, हे लक्षात घेऊन प्रकल्प अधिकाऱ्यांची पदे त्वरित भरावी व वांगणी आश्रमशाळेत मुख्याध्यापक व अधीक्षकपद लवकर भरावे, असा इशारा मोर्चाचे नेतृत्व करणारे कॉ. रतन बुधर यांनी दिला आहे. या वेळी पं.स. सदस्य कॉ. यशवंत घाटाळ, पं.स. सदस्य कॉ. लक्ष्मण जाधव, जिल्हा कमिटी सदस्य कॉ. शिवराम घाटाळ, तालुकाध्यक्ष यशवंत बुधर, कॉ. शांतीबाई खुरकुटे, दसू जाब, विजय शिंदे, नवसू बुधर, लक्ष्मण पारधी तसेच शेकडो कार्यकर्ते व पालकवर्ग उपस्थित होता. (वार्ताहर)