शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वसईत खंडणीचे चार गुन्हे, माहिती अधिकारामुळे अनेकजण रडारव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 03:12 IST

वसई : माहितीच्या अधिकारात माहिती मागवून खंडणी मागितल्याप्रकरणी विरार, नालासोपारा आणि तुळींज पोलीस ठाण्यात एकाच रात्री चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांना अटक करण्यात आली असून शिवसेना नगरसेवकाविरोधात तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख शिरीष चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून नालासोपारा पोलीस ठाण्यात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष गोविंदा ...

वसई : माहितीच्या अधिकारात माहिती मागवून खंडणी मागितल्याप्रकरणी विरार, नालासोपारा आणि तुळींज पोलीस ठाण्यात एकाच रात्री चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांना अटक करण्यात आली असून शिवसेना नगरसेवकाविरोधात तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख शिरीष चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून नालासोपारा पोलीस ठाण्यात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष गोविंदा गुंजाळकर यांच्याविरोधात पाच लाख रुपये खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छत्रपती शिक्षण संस्थेच्या बांधकामाची तक्रार करून गुंजाळकर यांनी खंडणी मागितल्याची चव्हाण यांची तक्रार आहे. याप्रकरणी गुंजाळकर यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली.शिवसेना नगरसेवक धनजंय गावडे यांच्याविरोधात तुळींज पोलीस ठाण्यात दोन आणि विरार पोलीस ठाण्यात खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विरार येथील बिल्डरने दिलेल्या तक्रारीवरून गावडे यांच्यासह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील दोघांना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यात आरोपींनी पत्तीस लाख रुपयांची खंडणी घेतल्याची तक्रार करण्यात आली आहे. तुळींज पोलीस ठाण्यात गावडे यांच्याविरोधात खंडणी मागितल्याचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर भाजपा युवा मोर्च्याचे पदाधिकारी अरुण सिंग यांच्याविरोधातही तुळींज पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आलेली आहे. दरम्यान, माहिती अधिकारात मागवून खंडणी मागितल्याप्रकरणी सदर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे वसई विरार परिसरात खळबळ उडाली आहे.माहिती अधिकारामुळे अनेकजण रडारवरवसई-विरार महानगरपालिकेच्या हद्दीतील अनेक बिल्डर गत काही वर्षांमध्ये भरडले गेले आहेत. त्यांच्या विरोधात माहिती मागवून त्यांना ब्लॅकमेल करण्याच प्रकारही उघड झाले असल्याने हा विषय संवेदनशिल बनला आहे.जिल्हा पोलीस अधिक्षक मंजुनाथ सिंगे यांनी या प्रकरणी आवाहन करुन ज्यांच्याकडून खंडणी घेतली आहे. अशांची चौकशी होणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात विरार, नालासोपऱ्यातून तक्रारी होऊ शकतात.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार