शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

‘दिव्यलक्ष्मी’ची चार दिवसांनी सुटका

By admin | Updated: February 21, 2016 02:31 IST

समुद्रात मत्स्य दुष्काळाचे सावट घोंगावत असताना मासेमारीच्या तयारीत समुद्रात जाण्यासाठी उभी असलेली दिव्यलक्ष्मी ही नौका ४ दिवसांपासून सातपाटी खाडीच्या गाळामध्ये

पालघर : समुद्रात मत्स्य दुष्काळाचे सावट घोंगावत असताना मासेमारीच्या तयारीत समुद्रात जाण्यासाठी उभी असलेली दिव्यलक्ष्मी ही नौका ४ दिवसांपासून सातपाटी खाडीच्या गाळामध्ये अडकून पडल्याने म्हात्रे कुटुंबीय आर्थिक संकटात सापडले होते. मदतीचा कुठलाही धागा दिसत नसताना सातपाटीचे मच्छीमार अनिल चौधरी यांनी आपल्या काही निवडक सहकाऱ्यांसह अत्यंत कठीण परिस्थितीतून त्या नौकेला बाहेर काढण्यात यश मिळविले. शुक्रवारी ही नौका मासेमारीसाठी समुद्रात रवाना झाली.सातपाटी हे मासेमारीसाठी प्रसिद्ध बंदर असून सुमारे ४०० नौकांद्वारे मासेमारी केली जाते. या मासेमारी बंदरामध्ये अनेक समस्या असल्याने जिल्हा नियोजन समिती आणि राज्य शासनाकडून सुमारे ३८ ते ४० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. गावाच्या पश्चिमेकडील समुद्रातील खडक फोडणे, खाडीत सोयीसुविधा निर्माण करणे, मासळी बाजार बांधणे, खाडीत साचलेला गाळ काढणे इ. सोयीसुविधांसाठी हा निधी मंजूर करण्यात आला होता. त्यापैकी अनेक कामे आजही प्रगतीपथावर आहेत. परंतु, खाडीतील गाळ काढण्यासंदर्भात मेरीटाइम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी चालवलेली बेपर्वाई मच्छीमारांच्या मुळावर आली आहे. ४ वर्षांत ३ वेळा खाडीत पोहोचलेला ड्रेजर अधिकारी आणि काही अतिउत्साही मच्छीमारांच्या सूचनेमुळे खाडीतील गाळ काढण्यात यशस्वी ठरलेला नाही.सातपाटी येथील पंकज सुभाष म्हात्रे यांची दिव्यलक्ष्मी ही नौका ४ दिवसांपूर्वी समुद्रात मासेमारीला जाण्याच्या तयारीत असताना खाडीतील गाळात अडकून पडली. अनेक प्रयत्नांनंतरही ही नौका ४ दिवस पार होऊनही गाळातून निघू शकली नाही. त्यामुळे पूर्ण म्हात्रे कुटुंब संकटात सापडले होते. मच्छीमार अनिल चौधरी यांना समजल्यानंतर त्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर, त्यांनी नौकेच्या एका बाजूने ५ फूट खोल आणि १०० फूट लांब खड्डा खणून भरतीच्या प्रवाहाच्या पाण्याने ही नौका सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळवले. (वार्ताहर)