शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांचे लक्ष फक्त चार तालुक्यांवर

By admin | Updated: August 24, 2015 23:19 IST

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील जिल्ह्यातील सर्व रस्ते उखडले असून गणपती बाप्पाच्या आगमनापूर्वी त्यांची डागडुजी करणे आवश्यक असताना पालकमंत्र्यांनी फक्त त्यांच्या मतदारसंघातील

- हितेन नाईक,  पालघरसार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील जिल्ह्यातील सर्व रस्ते उखडले असून गणपती बाप्पाच्या आगमनापूर्वी त्यांची डागडुजी करणे आवश्यक असताना पालकमंत्र्यांनी फक्त त्यांच्या मतदारसंघातील चार तालुक्यांतील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी १ कोटी ७० लाख २९ हजारांचा निधी मंजूर करून घेतला आहे. त्यामुळे पालघरसह अन्य तीन तालुक्यांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली असून या दुजाभावामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.पालघर हे जिल्ह्याचे ठिकाण असून या तालुक्यामध्ये सर्वात जास्त रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येतात. यातील सर्व रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. डहाणू, तलासरी, वसई तालुक्यांतील रस्त्यांचीही अशीच बिकट अवस्था आहे. जिल्ह्यातील आठ तालुक्यांपैकी विक्रमगड, जव्हार, वाडा, मोखाडा हे चार तालुके पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या मतदारसंघात येतात. या चार तालुक्यांतील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी पालकमंत्र्यांनी निधी उपलब्ध करून दिला असून उर्वरित पालघर, डहाणू तलासरी, वसई या तालुक्यांना निधीपासून वंचित ठेवण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विक्रमगड तालुक्यातील सहा रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ४७ लाख ९० हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. वाडा तालुक्यातील सहा रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ४२ लाख २० हजार रुपयांचा निधी देण्यात आला असून जव्हार तालुक्यातील सात रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ४१ लाख १९ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहे. तर, मोखाडा तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीच्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ३९ लाख रुपयांचा निधी पालकमंत्र्यांनी मंजूर करून घेतला आहे. डहाणूची आमदारकी धनारेंच्या रुपाने भाजपाकडे असूनही या तालुक्याची उपेक्षा झाली आहे.हे आहे वास्तव...पालघर तालुक्यातील पारगावनाका ते सोनावे, दारशेत, सफाळा ते घाटीम, मासवण ते नागझरी, धुकटणफाटा ते बहडोली, दहिसर, एडवण, कोरे, रातिवरे, आगारवाडी ते निघरे, नवापूर ते मुरसे, बोईसर ते शिगाव, सेटेगाव ते माकडचोळा, नागझरी ते नानिवली, आदिवासी स्टॉप ते गिरनोली आदी रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी एकही रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. तसेच वसई, डहाणू, तलासरी तालुक्यांतील रस्त्यांचीही अशीच बिकट अवस्था असून त्या तालुक्यांच्या तोंडालाही पाने पुसण्यात आली आहे.