शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

अर्नाळ्यातील मच्छीमारांचा उद्रेक; ४ दिवसांपासून वीज नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 23:26 IST

५०० ते ६०० स्थानिकांचा अडीच तास रास्ता रोको

नालासोपारा : अर्नाळा गावात बुधवारपासून तब्बल ४ दिवस वीज नसल्याने बुधवारपासून चार दिवस वीज नसल्यामुळे स्थानिक ५०० ते ६०० मच्छिमारांनी रविवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास उत्स्फूर्तपणे रास्ता रोको केला. कायदा तसेच सुव्यवस्था बिघडू नये यासाठी अर्नाळा पोलीस घटनास्थळी पोलीस फौजफाट्यासह पोहोचले होते. महावितरणचे अधिकारी, इंजिनियर, कर्मचाऱ्यांनी वीज पूर्ववत करण्यासाठी रविवारी संध्याकाळपर्यंतचा वेळ मागितल्यावर स्थानिकांनी हे आंदोलन मागे घेतले असून रविवारी संध्याकाळपर्यंत वीज आली नाही, तर सोमवारी जे होईल त्याला राज्य शासन आणि महावितरण जबाबदार राहील असा सज्जड दमही देण्यात आला.

बुधवारपासून वीज खंडित झाल्याने अर्नाळा गावातील रहिवासी मेटाकुटीस आले होते. याचाच उद्रेक होऊन नागरिकांनी अर्नाळा गावातील मुख्य रस्त्यावर वीज कंपनीच्या भोंगळ कारभाराविरोधात आपला संताप व्यक्त केला. अधिकाऱ्यांच्या बेफिकिरीबाबत रस्ता अडवून निषेध व्यक्त केला आहे. वीज कार्यालयात तक्रार केल्यावर कधी फिडर फेल, कधी झंपर तर कधी ट्रान्स्फॉर्मर गेल्याची उत्तरे मिळतात. नेहमीच काही ना काही तांत्रिक बिघाड होत असल्याची कारणे वीज अधिकाºयांकडून मिळतात. विशेष म्हणजे, या गंभीर समस्येवर उपाय म्हणून या परिस्थितीत महावितरण कंपनीकडे कायम स्वरूपाची उपयोजना नाही. त्यातच येथील अधिकारी नागरिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करतात.

दरम्यान वीज गेल्यावर रात्रपाळीचे लाईनमन, कनिष्ठ अभियंता उपलब्ध नसतात, दूरध्वनीवर तक्र ारी दिल्या तरी त्याकडे दुर्लक्ष करतात मात्र अव्वाच्या सव्वा आलेली वीज बिले भरण्यासाठी मात्र, वीज अधिकारी नागरिकांच्या मागे तगादा लावतात अन्यथा वीज खंडित केली जाते. अशा नेहमीच्या त्रासाला कंटाळून अर्नाळा येथील मुख्य रस्त्यावर नागिकांनी मोर्चा काढून आंदोलन केले.गेल्या ४ दिवसांपासून वीज नसल्याने ५०० ते ६०० मच्छीमार स्थानिकांनी अडीच तास रास्ता रोको केला होता. संध्याकाळ पर्यंतचा वीज पूर्वरत करण्यासाठी महावितरणच्या अधिकारी व इंजिनियर, कर्मचाºयांना वेळ दिला आहे. - राजू तांडेल (अध्यक्ष, मच्छिमार स्वराज समिती, अर्नाळा)

गावात विजेसाठी ट्रासफार्मर लावला होता पण तो बंद झाल्याने दुसरा ट्रान्सफार्मर लावला होता पण तोही बंद झाला आहे. पापडी येथून ३१५ केवी चा ट्रान्सफार्मर मागवला असून तो लावल्यावर वीज पूर्वरत होईल. ३ इंजिनियर आणि कर्मचारी सदर ठिकाणी हजर असून युद्धपातळीवर काम करून वीज पूर्वरत केली जाईल. - अनवर शेख (कनिष्ठ अभियंता, वसई)

टॅग्स :fishermanमच्छीमार