शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
4
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
5
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
6
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
7
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
8
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
9
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
10
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
11
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
12
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
13
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
14
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
15
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
16
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
17
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
18
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
19
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
20
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मच्छीमार बोटीला जहाजाची बसली धडक, १६ जण बचावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 01:58 IST

मुरबे येथील सुनील तरे यांच्यासह १२ मच्छीमारांनी कर्जे काढून तर काहींनी आपल्या घरातील सोन्याचे दागिने बँकेत गहाण ठेऊन एक बोट बांधली.

पालघर : अरबी समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या मुरब्याच्या ‘आई एकवीरा’ या बोटीतील १६ मच्छीमार जाळी समुद्रात टाकून झोपले असताना शनिवारी पहाटे साडेतीन वाजता एका मोठ्या जहाजाने दिलेल्या धडकेमुळे ती बोट शेकडो फूट फरफटत गेली. या बोटीचे नुकसान झाले असून सुदैवाने १६ मच्छीमार बचावले आहेत.मुरबे येथील सुनील तरे यांच्यासह १२ मच्छीमारांनी कर्जे काढून तर काहींनी आपल्या घरातील सोन्याचे दागिने बँकेत गहाण ठेऊन एक बोट बांधली. मोठ्या आनंदाने मच्छीमारांचे कुलदैवत असलेल्या ‘आई एकविरा’ असे नाव बोटीला देऊन त्यांनी मासेमारीला सुरूवातही केली होती. २ आॅक्टोबर रोजी सर्व मच्छिमार आपली बोट घेऊन मच्छीमारीला निघाले. बोट खोल समुद्रात ३० नॉटिकल समुद्री मैलावर असलेल्या आपल्या कवी जवळ पोहचल्यावर त्यांनी आपल्या बोटीतील जाळी मांडून तीन बल्ब लाऊन ते झोपले.पहाटे ते साखर झोपेत असताना त्यांच्या बोटीला धडक बसल्याने सर्व खडबडून जागे झाले. त्यांनी बाहेर पाहिले असता आपल्या बोटीच्या अँकरला लावलेला दोरखंड त्या मोठ्या जहाजाला अडकून ती बोट फरफटत जात असल्याने सर्व घाबरून बोटीत एकच गोंधळ उडाला. मात्र सुदैवाने जहाजाला अडकलेला दोरखंड तुटल्याने बोट जहाजपासून वेगळी झाली. या घटनेत बोटीचे मोठे नुकसान झाल्याचे सुनील तरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. वाढवण बंदर झाल्यास मोठ्या जहाजांची वाहतूक वाढून मच्छीमारांना याचा त्रास सहन करावा लागले असे बोलले जात आहे.खोल समुद्रातून ये-जा करताना मोठ्या जहाजाने आपल्या मार्गात येणाऱ्या लहान जहाजांना बाजूला होण्यासाठी हॉर्न वाजवून बाजूला होण्याचा इशारा द्यायचा असतो. परंतु ‘आई एकविरा’ बोटीला तीन बल्ब लावलेले असतानाही आम्हाला कुठलाही इशारा न देता आमच्या बोटीला धडक मारून ते जहाज निघून गेले. त्या जहाजाला अडकलेला दोरखंड तुटला नसता तर आम्ही सर्व १६ जण बोटीसह त्या जहाजाच्या खाली सापडून मृत्युमुखी पडलो असतो.- सुनील तरे, बोट मालक.वाढवण बंदर झाल्यास मोठ्या बोटीची ये-जा वाढणार असून मच्छीमार बोटींना धोका वाढणार आहे.- राजन तरे, सामाजिक कार्यकर्ते, मुरबे

 

टॅग्स :palgharपालघर