शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

वाडा येथील फटाक्यांची दुकाने हाऊसफुल्ल

By admin | Updated: November 4, 2015 00:21 IST

जिल्ह्यातील प्रत्येक शहरामध्ये घाऊक व किरकोळ विक्रेते असतानाही वाडा शहरातील स्वस्त फटाके घेण्याचा व्यापाऱ्यांचा कल अधिक असल्याचे आढळून आलेले आहे. दिवाळी हा सण

वाडा : जिल्ह्यातील प्रत्येक शहरामध्ये घाऊक व किरकोळ विक्रेते असतानाही वाडा शहरातील स्वस्त फटाके घेण्याचा व्यापाऱ्यांचा कल अधिक असल्याचे आढळून आलेले आहे. दिवाळी हा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. तरी मंदीचे सावट असल्यामुळे दरवर्षी प्रमाणे या वर्षी गर्दी कमी दिसते. परंतु वाड्याला फटाके स्वस्त मिळत असल्याने किरकोळ व घाऊक विक्रेते या ठिकाणी येऊन फटाके खरेदी करतात. मोठ्या प्रमाणात हा व्यवसाय येथे चालत असून वर्षभरात ५०० कोटींहुन अधिक रू. चा व्यवसाय होत असल्याचे जाणकारांचे मत आहे.पालघर व ठाणे जिल्'ातील घाऊक व किरकोळ फटाके विक्रेत्यांसह बोरीवली, पनवेल, उरण, रायगड, रत्नागिरी, नाशिक या जिल्ह्यांत फटाके विक्रेते असूनही विक्रेते वाड्याकडे धाव घेऊन फटाक्यांची खरेदी करतात. पूर्वी फटाक्यांची दिवाळीलाच विक्री व्हायची मात्र आता हा धंदा बारमाही झाला असल्याचे वाड्यातील व्यापारी दिलीप पातकर यांनी सांगितले. वाडा शहरापासून १ कि. मी. अंतरावर असलेल्या देसई नाक्यावरील दुकाने ठाणे, पालघर जिल्ह्यांतच नव्हे तर आजुबाजूच्या शहरातील फटाक्यासाठी प्रसिद्ध आहे. या दुकानांत साधारणपणे २०० कामगार कार्यरत आहेत. उत्तर प्रदेशातील शिवकाशी येथे फटाक्यांचे उत्पादन केले जाते. तेथून संपूर्ण फटाक्यांचा माल वाड्यात आणला जातो. गेल्यावर्षाच्या भावापेक्षा या वर्षी फटाक्यांचा भाव १० ते १५ टक्क्यांनी अधिक वाढला आहे. अशी माहिती येथील फटाके विक्रेत्यांनी दिली. सध्या फॅन्सी अ‍ॅटमची मागणी जास्त आहे. फॅन्सी अ‍ॅटमची ५० रू. पासून ५००० रू. पर्यंत आहे. यामध्ये फोटो फ्लॅश, जेट फाऊंटन, कलरगोळी, वंडर लाईट, स्वस्तिक व्हील, लायटींग थंडर, मल्टीशॉट, मल्टीबार, रॉबिट डान्सिंग, पॅराशुट, कलर बॉल, स्कॉचवे, हंट्रेड शॉट आदी आकाशातील रंगीबेरंगी फटाके यांना जास्त मागणी आहे. तसेच सुतळी बॉम्ब, फुलबाजा, अ‍ॅटम बॉम्ब, जमीन चक्र, अनार, लवंगी, फटाकडी, इ. प्रकारही ग्राहकांना परवडणारे असून ते मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. मल्टीशॉट ६० शॉट, १२० शॉट, २४० शॉट यांची किंमत ४०० रू. पासून १००० रू. पर्यंत आहे. फुलबाजे पाच रू. पासून २५० रू. पर्यंत हजारांची माळ २०० पासून ५०० रू. पर्यंत अशा किमती आहेत. येथे येणारे बहुतांश ग्राहक हे घाऊक फटाके विक्रेते आहेत. किरकोळ ग्राहक हे दिवाळी सणाच्या पाच ते सात दिवस अगोदर येवून फटाके खरेदी करतात. या दिवसात फटाक्यांची अनेक दुकाने रात्रंदिवस सुरू असतात.