पारोळ : नववर्षाच्या पहिल्या पहाटेच सोपारा मार्गावरील वाळणपाडा येथे स. ४ वा. च्या सुमारास एका प्लॅस्टीक कंपनीमध्ये शाटसर्कीटमुळे आग लागली. आग लागली तेव्हा त्या कंपनीमध्ये कामगार झोपलेले होते.पण आग लागताच कंपनीबाहेर ते आल्याने जिवीतहानी टळली. पण कंपनीमधील सामान आगीत जळून खाक झाले. या आगीने रूद्ररुप धारण केल्याने ती विझवण्यासाठी वसई विरार शहर महानगरपालिकेच्या अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आले. पण स. ६.३० वा. दलाची गाडी येऊन ही आग आटोक्यात आणली.या आगीमध्ये मोठे नुकसान झाले असले तरी त्या कंपनीच्या मालकाने या ठिकाणी येणे व नुकसानीची माहिती देणे टाळले. त्यामुळे आग लागलेली कंपनी विनापरवाना आहे का हा प्रश्न पोलीसांना पडला असून सदर घटनेची वालीव पोलीस चौकशी करत आहेत. (वार्ताहर)
सोपारा वाळणपाड्यात प्लास्टिक कंपनीला आग
By admin | Updated: January 2, 2016 08:34 IST