शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

भंगार वाहनात आढळले भरलेले गॅस सिलिंडर; वितरकांचा निष्काळजीपणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 00:33 IST

विशेष म्हणजे गॅसने भरलेले हे सिलिंडर भंगार वाहनांत ठेवलेले असल्याने वाढत्या उन्हात दुर्घटना घडल्यास याला जबाबदार कोण, असा प्रश्न नागरिकांनी केला आहे.

विरार :  वसई-विरार परिसरात गॅस वितरक अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली नागरिकांच्या जिवाशी खेळ मांडत असल्याचे समोर आले आहे. नालासोपारा पश्चिम येथील नागरी वस्तीत गॅस सिलिंडरच्या गाड्या उभ्या करून नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण करत आहेत. विशेष म्हणजे गॅसने भरलेले हे सिलिंडर भंगार वाहनांत ठेवलेले असल्याने वाढत्या उन्हात दुर्घटना घडल्यास याला जबाबदार कोण, असा प्रश्न नागरिकांनी केला आहे.वसई पुरवठा विभागाकडील माहितीनुसार, वसई-विरार परिसरात तीन लाख ३२ हजार ३९५ गॅस ग्राहकांची नोंद आहे, तर २६ वितरक  गॅस सिलिंडरचा पुरवठा करत आहेत. मात्र गॅस वितरक भरलेले गॅस सिलिंडर भंगार अवस्थेतील वाहनांत ठेवत आहेत. काही ठिकाणी तर गॅस वितरणासाठीच भंगार वाहनांचा वापर केला जात असल्याचे समोर आले आहे.विशेष म्हणजे या वाहनांची वाहन योग्यता चाचणी केली जात नाही. प्रदूषण चाचणी तसेच या गाड्यांचा विमा उतरवलेला नसतो. यामुळे ही धोकादायक वाहने अतिज्वलनशील पदार्थ घेऊन जात असताना कोणत्याही अपघाताला बळी पडू शकतात. या वाहनात आग प्रतिबंधक उपकरणे नसतात. यामुळे अपघात झाल्यास मोठी जीवितहानी होऊ शकते.नालासोपारा पश्चिम येथे उभा असलेला ट्रक अगदी भंगार अवस्थेत गेला आहे. या वाहनाला दिवे नाहीत, टायर पंक्चर आहेत. हे वाहन भंगार अवस्थेत असतानाही या वाहनातून ५० ते ७० सिलिंडर ठेवण्यात आले आहेत. वितरकांच्या अशा निष्काळजीमुळे नागरिकांचा जीव धोक्यात असल्याने अशा वितरकांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.