शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

बनावट खवा, मिठाईविरुद्ध एफडीएचे धाडसत्र

By admin | Updated: September 15, 2015 23:05 IST

गणेशोत्सव आणि गौरी सणांसाठी वापरल्या जाणाऱ्या मिठाईचा महत्वपूर्ण घटक असलेल्या खव्यातील भेसळ व बनावट खवा रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने

ठाणे : गणेशोत्सव आणि गौरी सणांसाठी वापरल्या जाणाऱ्या मिठाईचा महत्वपूर्ण घटक असलेल्या खव्यातील भेसळ व बनावट खवा रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने व्यापक मोहीम हाती घेतली असून धाडसत्रही सुरू केले आहे. गुजरातमधून मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणावर खवा येतो. तसेच तो पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातूनही येतो. अनेकदा त्यात भेसळ असते. तसेच तो शिळा असतो. अशा खव्यात पूर्वी विषबाधा होण्याच्या घटना घडल्याने त्याविरुद्ध आधीपासूनच प्रतिबंधात्मक कारवाई एफडीएने सुरू केली आहे. शहा मणीलाल नरसी या फर्मवर धाड घातली असता शुद्ध पामतेलाच्या डब्यात तळणासाठी वापरून उरलेले खाद्यतेल भरलेले असल्याचे आढळून आले. तर कोपरखैरणे येथे मिठाईच्या दुकानावर धाड घातली असता काजूरोल या मिठाईत भेसळ केली असल्याचे आढळून आले. या दोन्ही धाडी शनिवारी घालण्यात आल्या. हे धाडसत्र अधिक व्यापक केले जाणार आहे. खव्यामध्ये भेसळ करण्यासाठी उकडलेले बटाटे, रताळी, आरारुटची पावडर, तांदुळ आणि मैदा आदींचा वापर केला जातो. त्यातून अनेकदा विषबाधाही होऊ शकते. विशेषत: गणेशोत्सव आणि दिवाळी या सणांच्या काळात खव्यातल्या भेसळील अधिक ऊत येतो. म्हणून ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. खव्याचे एकूण पाच प्रकार असतात. त्यातला पहिला असतो बाटी या खव्यात मॉईश्चर कमी असते. दुसऱ्याला चिकना म्हणतात. त्यामध्ये ५० टक्के मॉईश्चर असते. त्याचा वापर फॅन्सी मिठाईसाठी होतो. तिसऱ्या प्रकाराला दाणेदार असे म्हणतात. त्याचा वापर कलाकन आणि विविध प्रकारच्या बर्फी तयार करण्यासाठी होतो. तसेच पिंडी नामक खवा पेढे तयार करण्यासाठी वापरला जातो. तर धाप नावाचा खवा गुलाबजाम करण्यासाठी वापरला जातो. खव्याचा भाव साधारणत: प्रतीनुसार २५० ते ५०० रुपये किलो आहे. एक लिटर दूध आटवले की, साधारणत: २०० ते २५० ग्रॅम खवा मिळतो. या हिशोबाने गोठ्यातले चांगले दूध ६० रुपये लिटर भावाचे धरले तर एक किलो खव्यासाठी ४ ते ५ लिटर दूध लागते. परंतु अनेक व्यापारी अशा पिवर खव्यात २० ते ३० टक्के भेसळ करतात आणि किलोमागे अधिक नफा मिळवू पाहतात. जो खवा सामान्य पेढे निर्मितीसाठी वापरला जातो त्यात ४० ते ५० टक्के भेसळ होऊ शकते. ही भेसळ ओळखण्यासाठी एफडीएने अत्यंत सोप्या अशा पद्धती शोधून काढल्या आहेत. खव्यावर आयोडीनचे काही थेंब टाकले आणि तो निळा पडला तर त्यात मैदा अथवा तांदळाच्या पिठाची भेसळ केलेली आहे, हे लगेच कळून येते. याशिवाय सल्फ्युरिक अ‍ॅसिडचा वापर करूनही भेसळ ओळखता येते. अनेकदा मिठाई फॅन्सी करण्यासाठी तिला चांदीचा वर्ख लावला जातो. अनेकदा तो खाण्याच्या प्रतिचा नसतो. तसेच मिठाईतील रंगही अनेकदा दुय्यम दर्जाचे असतात. त्यामुळे ग्राहकांनी फॅन्सी मिठाई खरेदी न करता रंग आणि वर्ख याचा वापर नसलेली पारंपारिक मिठाई खरेदी करावी, असे आवाहन एफडीएने केले आहे.