शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

By admin | Updated: August 15, 2015 22:42 IST

जव्हार तालुक्यातील आठ वर्षांपूर्वी खडखड धरण बांधण्यासाठी खडखड त्याच्या प्रकल्पग्रस्त आदिवासींच्या पुनर्वसनासाठी आसरानगर हे नवे गाव घोषित केले. मात्र, आठ वर्षे उलटली

जव्हार : जव्हार तालुक्यातील आठ वर्षांपूर्वी खडखड धरण बांधण्यासाठी खडखड त्याच्या प्रकल्पग्रस्त आदिवासींच्या पुनर्वसनासाठी आसरानगर हे नवे गाव घोषित केले. मात्र, आठ वर्षे उलटली असूनसुद्धा आजपावेतो तेथे वीजपुरवठा, रस्ते, पाण्याची सुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत. या सुविधा मिळण्याकरिता अलताफ शेख व आसरानगर गाव समिती अध्यक्ष रवी लाखन यांनी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, जव्हार, मोखाडा, विक्रमगड, वाडा या सर्व तालुक्यांचा महसूल तथा इतर सर्व विभागांच्या प्रशासकीय कामाचा कारभार अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय जव्हार येथूनच करावा. येथून नेलेली खाती परत जव्हारलाच सुरू करावी. डोमिहीरा (खडखड) धरण प्रकल्पबाधितांच्या आसरानगर या गावाला महसुली दर्जा देऊन तत्काळ वीजपुरवठा सुरू करून येथील आदिवासी जनतेला समाजमंदिर आणि स्मशानभूमी उपलब्ध करून द्यावी. जव्हार एसटी स्टॅण्डच्या आवारात पत्र्यांच्या कम्पाउंडमधून अंबिका चौक, गांधी चौक, रिझवी मोहल्ला येथील वयोवृद्ध प्रवाशांकरिता येण्याजाण्यासाठी ५ फुटांचा रस्ता मोकळा करावा. जमीन घोटाळा करून जनतेची व प्रशासनाची फसवणूक करणाऱ्या भूमाफिया, तलाठी, दुय्यम निबंधक यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावेत, आदींसाठी हे उपोषण आहे असे सांगितले. (वार्ताहर)