शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

वसईतील शेतकऱ्यांची सुगी

By admin | Updated: November 9, 2016 03:35 IST

भाताच्या कापण्या दिवाळीमुळे मंदावल्या होत्या. परंतु भाऊबीज संपल्याबरोबर वसईच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी मजुरांची जुळवाजुळव करून पुन्हा जोमाने त्या सुरु केल्या आहेत.

सुनील घरत,  पारोळभाताच्या कापण्या दिवाळीमुळे मंदावल्या होत्या. परंतु भाऊबीज संपल्याबरोबर वसईच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी मजुरांची जुळवाजुळव करून पुन्हा जोमाने त्या सुरु केल्या आहेत. येथील मजूर १५ दिवसांनी वीट भट्टी, बांधकामव्यवसाय, वसई पश्चिमेतील वाड्या, सागरी भागात मासेमारी करण्यासाठी जात असल्याने पुढील दोन आठवड्यात कापण्या पार पडल्या पाहिजेत. नाहीतर मजूर टंचाई निर्माण होईल म्हणून कापण्या सुरू केल्याचे शेतकरी सांगत आहेत. चालू वर्षी निसर्गराजाने बळीराजाला योग्य साथ दिल्याने चांगले पीक हाती लागले आहे. यामुळे येथील बळीराजा जोमाने कामाला लागला आहे . कापणी करून भारे बांधणी झालेले पीक खळ्याच्या सभोवताली उडवी रचून ठेवण्यात येत असून एक खळे साधारणत: तीन ते चार शेतकरी मिळून करत आहेत. यामुळे झोडणी पर्यंत पिकाचे संरक्षण सांघिक पद्धतीने करता येते. यातून येथील शेतकऱ्यांमध्ये सांघिक भावना रुजत असून पुढे काळाची गरज बनलेल्या सांघिक शेतीसाठी योग्य वातावरण ग्रामीण भागात तयार होत असल्याचे कृषी सहाय्यक अधिकारी अनिल मोरे यांनी सांगितले. यासाठी या भागातील शेतकऱ्यांना एकत्र आणण्याचे प्रयत्नही सुरु झाले असून खानिवडे येथे शेतकऱ्यांचा एक गट बनवण्यात आला आहे .