शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

एक्स्प्रेस हाय वे विरोधात शेतकरी एकवटले

By admin | Updated: May 11, 2017 01:40 IST

पालघर पूर्व भागात होणाऱ्या मुंबई बडोदा एक्सप्रेस हायवेला शेतकरी संघर्ष समिती व ग्रामस्थांचा असलेला विरोध मनोर पोलीस ठाण्यात पोलीस

आरिफ पटेल। लोकमत न्यूज नेटवर्कमनोर : पालघर पूर्व भागात होणाऱ्या मुंबई बडोदा एक्सप्रेस हायवेला शेतकरी संघर्ष समिती व ग्रामस्थांचा असलेला विरोध मनोर पोलीस ठाण्यात पोलीस, महसूल अधिकारी, संघर्ष समिती अध्यक्ष व सदस्यांच्या बुधवारी झालेल्या बैठकीतही अधिकच तीव्र झाला. या वेळी काहीही झाले तरी जमिनीचे मोजमाप होऊ देणार नाही अशी ठाम भूमिका समितीतर्फे घेण्यात आली.पालघर तालुक्यातील पूर्व जंगलपट्टी भागात येणारे नावझे, साखरे, दहिसर, खांलोली,धुकटन, वंदिवली, काटाले, लहोरे, निहे, नागझरी, लालोंढे,किराट, चिंचारे, रावते, अशी एकूण बारा गावे व पाड्यातील लोकांच्या शेतजमिनी, घरे मुंबई-बडोदा एक्सपे्रस हायवे मध्ये जाणार असून त्यांचे आयुष्य उध्वस्त होणार असल्याने संघर्ष समिती व गावकऱ्यांचा त्याला कायम विरोध रहाणार आहे असे अध्यक्ष संतोष पावडे व उपाध्यक्ष कमलाकर अधिकारी यांनी तहसीलदार महेश सागर याना सांगितले. त्या वेळी ते म्हणाले की, मोजणी करण्यास विरोध करू नका ती होऊ द्या. जमीन देणे न देणे हा तुमचा निर्णय आहे. या वर तुम्ही मिळून तोडगा काढा कोणा वरही अन्याय होऊ देणार नाही याची खात्री बाळगा. त्यावर कमलाकर अधिकारी यांनी आकरपट्टी पोफरण, महामार्ग क्र ८ मध्ये ज्यांच्या जमिनी, घरे गेली त्या शेतकऱ्यांची आजही काय अवस्था आहे ती पाहिली की, तुमच्यावर विश्वास कोण ठेवेल? असा प्रश्न केला. या वेळी अप्पर पो. अधीक्षक बी. जी. यशोद , उपअधीक्षक निमित्त गोयल, मंडळ अधिकारी बर्वे, तलाठी भोईर संघर्ष समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य उपस्थित होते. यावेळी तहसीलदार म्हणाले की, रस्त्यामध्ये जाणाऱ्या जमिनीच्या मोजणीसाठी सहकार्य केले पाहिजे. जमिनीचा मोबदला त्यांच्या मागणीनुसार शासन मंजूर करेल विकासासाठी रस्ता होणे गरजेचे आहे. आम्ही त्यांना समजवले तरी काही मार्ग निघाला नाही.