शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी व्यावसायिक शेतीकडे वळावे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 00:09 IST

राजेश पाटील : पारंपरिक शेतीमध्ये बदल व्हायला हवा

वसई : पालघर जिल्हा कृषीप्रधान आहे, मात्र येथील बेभरवशाच्या हवामानामुळे जिल्ह्यातील बहुतांश शेतकरीवर्ग हा शेती व्यवसायापासून दुरावत चालला आहे. शेती व्यवसाय टिकवायचा असेल तर जिल्ह्यातील पारंपरिक शेतीमध्ये व्यावसायिक बदल करण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत, असे मत आमदार राजेश पाटील यांनी व्यक्त केले.

पालघर जिल्ह्यातील बोटावर मोजण्याइतके शेतकरी सोडले, तर शेती व्यवसायामध्ये प्रचंड उदासीनता निर्माण झाली असल्याची खंत आ. राजेश पाटील यांनी बोलून दाखवली. ही उदासीनता दूर करून व्यावसायिक शेतीसाठी शेतकऱ्यांना उद्युक्त करण्यासाठी बोईसरचे बविआचे आमदार राजेश पाटील यांनी पुढाकार घेऊन महाराष्ट्र शासन कृषी विभाग, कुस्मो ॲग्रो (मुंबई) आणि वर्धन ॲग्रो प्रोसेसिंग लि. सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विकेल ते पिकेल’ या संकल्पनेवर आधारित पालघर जिल्ह्यात प्रथमच व्यावसायिक दृष्टीने उसाचे क्लस्टर उभे केले आहे.

शेतकऱ्यांचे कुटुंब खऱ्या अर्थाने आर्थिक सुलभता येऊन यशस्वी झाले पाहिजे, यासाठी आता आ. राजेश पाटील यांच्या संकल्पनेतून ऊसलागवडीचा शुभारंभ पालघर तालुक्यातील सातिवली येथील अंकुश देसले यांच्या शेतावर पार पडला. या कार्यक्रमाला वर्धन ॲग्रो प्रोसेसिंग लि.चे अध्यक्ष धैर्यशील दादा कदम तसेच प्रमुख पाहुणे म्हणून वसई-विरार महापालिकेचे माजी महापौर राजीव पाटील उपस्थित होते. त्यांच्यासमवेत विनायक काशीद, संचालक कुस्मो ॲग्रो (आंतरराष्ट्रीय कृषी अभ्यासक), डॉ कृष्णा परब, निर्यातदार आणि सारंग नेरकर, कृषी तंत्रज्ञ हे प्रमुख मार्गदर्शक आदी उपस्थित होते.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारthaneठाणे