शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
4
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
5
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
6
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
7
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
8
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
9
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
10
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
11
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
12
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
13
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
14
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
15
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
16
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
17
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
18
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
19
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
20
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी विकास महामंडळाकडून भातखरेदीची रक्कम मिळत नसल्याने शेतकरी झाले हवालदिल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 00:27 IST

कर्जाचा विळखा वाढण्याची भीती : महामंडळाच्या अधिकाऱ्यांना निर्वाणीचा इशारा

वाडा : तालुक्यातील शेतकऱ्यांची भातखरेदी आदिवासी विकास महामंडळाकडून करण्यात आलेली आहे. परंतु शेतकऱ्यांना भाताची रक्कम  आजतागायत मिळालेली नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून व इतर बँकांकडून कर्ज घेऊन भातशेती केली. त्यासाठी घेतलेल्या कर्जाचा भरणा ३१ मार्चपर्यंत केला तर शेतकऱ्यांना व्याजामध्ये सवलत दिली जाते. परंतु या मुदतीत महामंडळाकडून पैसे मिळतील अशी आशा शेतकऱ्यांना वाटत नसल्याने येथील बळीराजा कर्जाच्या विळख्यात अडकेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 

शेतकऱ्यांना तातडीने पैसे मिळावेत, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. यासाठी तालुक्यातील देवघर येथील प्रयोगशील शेतकरी प्रफुल्ल पाटील यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन महामंडळाच्या अधिकाऱ्यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. दरम्यान, या निवेदनाच्या प्रती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कृषिमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, आदिवासी विकासमंत्री के.सी. पाडवी, पालघरचे जिल्हाधिकारी डाॅ. माणिक गुरसळ, वाड्याचे तहसीलदार डाॅ. उद्धव कदम, पोलीस निरीक्षक सुधीर संख्ये यांनाही देण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाकडून वाडा तालुक्यात नऊ ठिकाणी भात खरेदी-विक्री केंद्रे सुरू करून शेतकऱ्यांच्या भाताचे संकलन करण्यात आले होते. या सर्व केंद्रांत १६ कोटी २८ लाख १३ हजार ४२२ रुपये इतक्या रकमेच्या भाताची खरेदी झालेली आहे. भातखरेदी केल्यानंतर शेतकऱ्यांना भातविक्रीची पावती देऊन नंतर त्यांच्या बँकेच्या खात्यात पैसे महामंडळाकडून जमा केले जातात. या वर्षी मात्र दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटला तरी भातविक्रीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. 

कर्जाची परतफेड करणार कशी?

शेतकऱ्यांनी बँकांमध्ये खेटे मारूनही त्यांना रिकाम्या हाताने परत फिरावे लागते. बँकेत पैसे जमा झाले नसल्याने शेतकरी महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडे चौकशी करण्याचा प्रयत्न करू लागतात, परंतु हे अधिकारी कार्यालयात भेटत नाहीत. महामंडळाच्या अधिकाऱ्यांना फोन केला तर तो उचलला जात नाही, अशाही तक्रारी शेतकरी करताना दिसत आहेत. त्यामुळे  ३१ मार्चअखेरीस बँकेच्या कर्जाची परतफेड करणार तरी कशी? या विवंचनेत शेतकरी सापडले आहेत.