शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

बनावट सोन्याचा सूत्रधार मोकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 01:43 IST

ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके च्या मोखाडा शाखे मध्ये फेब्रुवारी २०१६ मध्ये उघडकीस आलेल्या बनावट सोने तारण कर्ज घोटाळ्याला दिड वर्ष झाले तरी त्याचा सूत्रधार मोकाट आहे.

रवींद्र साळवे ।मोखाडा : ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके च्या मोखाडा शाखे मध्ये फेब्रुवारी २०१६ मध्ये उघडकीस आलेल्या बनावट सोने तारण कर्ज घोटाळ्याला दिड वर्ष झाले तरी त्याचा सूत्रधार मोकाट आहे. स्थानिक पोलीस तपास सुरू आहे एवढेच सरकारी उत्तर देत आहेत. त्यावरून या तपासाची कूर्मगती स्पष्ट होते. पोलिसांच्या या निष्क्रियतेबाबत तालुक्यात संताप व्यक्त होतो आहे. विशेष म्हणजे बँकदेखील हा तपास जलद गतीने व्हावा यासाठी कोणतेही प्रयत्न करीत नसल्याने तिच्याबद्दलही संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.परंतु यामधील खेदाची बाब म्हणजे या प्रकरणातील मुख्य आरोपी हेमंत उदावंत सह एकूण पाच आरोपी गेल्या सहा महिन्यांपासून फरार असून मोखाडा पोलिसांचा मात्र अद्यापही तपास चालू असल्याने त्यांच्या मोकाट मुसक्या मोखाडा पोलीस कधी आवळणार या प्रश्नाचे उत्तर पोलीस अधीक्षक शिंगे हे तरी देणार काय? असा प्रश्न विचारला जात आहे.मोखाडा शहरामध्ये बांधकाम व्यावसायिक म्हणून उदयास आलेला हेमंत उदावंत हा अवघ्या काही वर्षातच करोडपती झाल्याने तालुकाभर चर्चेचा विषय ठरला होता. मात्र अवघ्या काही दिवसातच त्याच्या अमाप मायेचे बिंग फुटले. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मोखाडा शाखेतील २.७३ कोटीच्या बनावट सोने तारण कर्ज घोटाळ्याचा तो सूत्रधार असल्याचे उघड झाले. त्याने आपली पत्नी, शाखा व्यवस्थापक मोरे, शाखा हिशेबनीस गावित व बँकेचा व्हॅल्युअर चंद्रकांत बागुल, बँकेचा वॉचमन तसेच आपला वाहनचालक वसिम मणियार व अन्य कामगार अशा एकूण १७ लोकांच्या नावे मोखाडा शाखेत ५ किलो ३३७ ग्रॅम म्हणजे जवळपास२ कोटी ७३ लाखाचे बनावट सोने तारण ठेऊन कर्ज घेतले. परंतु त्याची परत फेड वेळेत न झाल्याने तारण ठेवलेले सोने बनावट असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे या १७ कर्जधारकांवर मोखाडा पोलिस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले. परंतु मुख्य आरोपी सह एकूण पाच आरोपी मात्र फरार असून जव्हात मोखाडा येथे या सूत्रधाराचे राजरोस येणे जाणे होत असते.त्यामुळे मोखाडा पोलीस त्याच्यावर मेहरबान आहेत काय? अशी चर्चा सुरू आहे. सूत्रधारासह सर्व फरारींना त्वरित अटक करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.