शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

६९ वर्षांत साधा बल्बही पेटला नाही

By admin | Updated: August 25, 2015 22:44 IST

डहाणू तालुक्यातील ग्रामीण व आदिवासी भागातील गावपाडे अद्यापही विजेअभावी अंधारात चाचपडत आहेत. स्वातंत्र्य मिळून ६९ वर्षे झाली, मात्र ग्रामीण भागातील काही गावपाड्यांवर वीज पोहोचली नाही.

- शशिकांत ठाकूर,  कासाडहाणू तालुक्यातील ग्रामीण व आदिवासी भागातील गावपाडे अद्यापही विजेअभावी अंधारात चाचपडत आहेत. स्वातंत्र्य मिळून ६९ वर्षे झाली, मात्र ग्रामीण भागातील काही गावपाड्यांवर वीज पोहोचली नाही. यासंदर्भात महावितरणला अर्ज, विनंत्याही झाल्या, मात्र या भागाकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही.डहाणू तालुक्यातील ओसरवीरा, सुकटआंबा, चळणी, किन्हवली, दिवशी, दाभाडी, सोनाळे, खानीव, सायवन आदी गावांसह काही पाडे अद्यापही विजेच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे विजेवर चालणारे टीव्ही, फ्रीज, फॅन, संगणक, शेगडी आदी उपकरणे वापराचे सुख तर जाऊ द्या, पण रात्रीच्या वेळी अंधार दूर करण्यासाठीचे भाग्यही या जनतेच्या नशिबी नाही.ओसरवीरा येथील लाइमपाडा, शिंगाडपाडा, लाखानपाडा, डोंगरीपाडा या पाड्यांना अद्याप वीज नाही. वीज मिळण्यासाठी या गावांतील नागरिकांनी ४ वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीमार्फत वीज महामंडळ अधिकाऱ्यांकडे प्रस्तावही दिला होता. त्यानंतर, पाड्यांचा सर्व्हेही करण्यात आला आहे. मात्र, अद्याप विजेचा ठावठिकाणा नाही. येथील माजी पंचायत समिती सदस्य काशिराम रसाळ यांनी ओसरवीरातील चार पाड्यांवर अद्यापही विजेची सुविधा नाही. त्यामुळे येथील नागरिकांनी मोठी गैरसोय होते, असे लोकमतला सांगितले.लालफितीमुळे गैरमार्गाचा वापरया लालफितीच्या कारभारामुळे नागरिकांनी ज्या पाड्यांना विजेची सुविधा आहे, तेथून लाकडी खांब गाडून उघड्या तारा खेचून दुसऱ्याच्या मीटरमधून वीज नेली आहे. अशा गैरमार्गाने वीज नेल्याने धोकाही संभवतो. तर, काही नागरिक मात्र अंतर खूप असल्याने अंधारातच राहतात. दरम्यान, गावातील नागरिकांनी वारंवार अर्ज, विनंत्या करूनही अद्याप विजेची सुविधा न दिल्याने संताप व्यक्त होत आहे. काही गावपाड्यांवर विजेचे खांबही उभे केले, मात्र अद्याप वीजवाहक तारा खेचलेल्या नाहीत.