शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिष्ठानमुळे पोटनिवडणूक होणार

By admin | Updated: May 9, 2017 00:20 IST

जव्हार नगरपरिषदेचा कार्यकाल पूर्ण होऊन निवडणूका होण्यास अवघा सहा महिन्यांचा कालावधी बाकी असतांनाच ५ प्रभागाच्या

लोकमत न्यूज नेटवर्कजव्हार : जव्हार नगरपरिषदेचा कार्यकाल पूर्ण होऊन निवडणूका होण्यास अवघा सहा महिन्यांचा कालावधी बाकी असतांनाच ५ प्रभागाच्या घोषित झालेल्या पोटनिवडणुकांवर सर्वपक्षांनी बहीष्कार टाकला असला तरी भरत पाटील प्रणित जव्हार प्रतिष्ठानने ही निवडणूक लढविण्याचे ठरवल्याने नाईलाजास्तव सर्वच पक्ष ही निवडणूक लढत आहेत. यामुळे आता ही पोटनिवडणुक रंगतदार होणार आहे मात्र एकाही पक्षाने उमेदवारी अर्जा सोबत एबी फॉर्म न दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. २४ मे रोजी मतदान होणार असलेली ही निवडणूक आता होणारच यावर शिक्कामोर्तब झाले असून ही निवडणूक नकोच अशी भूमिका घेणाऱ्या विविध पक्षांच्या नेत्यांनीही अपक्ष म्हणून आपले अर्ज भरले आहेत. एकीकडे निवडणूक बहिष्काराच्या फोडलेल्या डरकाळ्या आणि दुसरीकडे त्या कायम ठेवल्या तर जव्हार प्रतिष्ठानचे उमेदवार बिनविरोध विजयी होतील अशा दुहेरी पेचात सर्वच राजकीय पक्ष सापडले आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांच्या नेत्यांनी ही निवडणूक अपक्ष म्हणून लढविण्याचा मध्यम मार्ग पत्करला आहे. त्यामुळे आता शिवसेना, राष्ट्रवादी आणि प्रतिष्ठान असा तिरंगी सामना रंगणार आहे. भाजप मात्र निवडणूकीत सध्या तरी आपले वेगळे अस्तित्व दाखवित नाही. कारण जव्हार प्रतिष्ठान म्हणजे भाजप कि भाजप म्हणजे जव्हार प्रतिष्ठान अशी गोंधळात घालणारी परीस्थिती सध्या आहे. मुळात जव्हार प्रतिष्ठान ने ही निवडणूक लढण्याची तयारी केल्यानंतर उर्विरत पक्षानी एकत्र येवुन यांचे पाणीपत करण्याची शक्कल सुरवातीला लढवली गेली होती मात्र या पोटनिवडणुकी नंतर होणार्या मुख्य निवडणूकीत पुन्हा आपल्याला एकमेकांसमोर लढायचे असल्याने टीकेला सामोरे जावे लागु शकते या शक्यतेने हा मानस गुंडाळण्यात आला. यामुळे जरी पक्षीये चिन्ह नाही मात्र पक्षाचाच उमेदवार म्हणून सर्व पक्ष आता ही पोटनिवडणुक ताकदीने लढणार असल्याचे दिसुन येत आहे.याशिवाय या निवडणूकीत सोशल मिडीयाचा वापर जोरदार असुन पक्षा बरोबरच वैयक्तीक टीका टीप्पणीही सुरु असल्याचे चित्र असुन ही पोटनिवडणुक गरमा गरमीच्या वातावरणातच पार पडेल हे नक्की...