शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

भार्इंदर स्थानकात एस्केलेटर

By admin | Updated: October 29, 2015 23:24 IST

भार्इंदर रेल्वे स्थानकात एप्रिल २०१६ पर्यंत दोन लिफ्ट व सरकते जिने बसविण्यात येणार असून मीरा रोड स्थानकातही ते लवकरच बसविण्यात येणार आहेत.

भार्इंदर : भार्इंदर रेल्वे स्थानकात एप्रिल २०१६ पर्यंत दोन लिफ्ट व सरकते जिने बसविण्यात येणार असून मीरा रोड स्थानकातही ते लवकरच बसविण्यात येणार आहेत.मीरा रोड व भार्इंदर रेल्वे स्थानकांत प्रत्येकी चार सरकते जिने व लिफ्ट बसविण्याची मागणी आमदार मुझफ्फर हुसेन यांच्या नेतृत्वाखाली मीरा-भार्इंदर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळाने मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि. (एमआरडीसी) चे मुख्य महाव्यवस्थापक प्रभात सहाय व मुख्य वाणिज्य महाव्यवस्थापक सी.पी. शर्मा यांना केली असता त्यांनी हे आश्वासन दिल्याचे जिल्हाध्यक्ष अनिल सावंत यांनी सांगितले.मीरा रोड व भार्इंदर रेल्वे स्थानके ही पश्चिम उपनगरांतील महत्त्वाची स्थानके असून या दोन्ही रेल्वे स्थानकांवरून सुमारे एक लाखाहून अधिक प्रवासी दररोज प्रवास करीत असतात. या दोन्ही स्थानकांचा रेल्वेच्या उत्पन्नात महत्त्वाचा वाटा असल्याने आवश्यक सोयीसुविधा मिळणे, हा येथील प्रवाशांचा मूलभूत अधिकार बनला आहे. ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन काँगे्रसने ही मागणी केली. त्यातील एकाचे काम सुरू झाले आहे. उर्वरित काम एप्रिल २०१६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती देऊन मीरा रोड रेल्वे स्थानकातील मागणीलाही मान्यता देत त्यांनी त्वरित प्रत्येकी दोन लिफट व सरकते जिने बसविण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले आहेत. (प्रतिनिधी)