शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठ्यासाठी आठ कोटी, तर आरोग्यासाठी चार कोटींची तरतूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 23:41 IST

पालघर जि.प.चा ६० कोटी ९९ लाखांचा अर्थसंकल्प मंजूर

हितेन नाईक पालघर : पाणीपुरवठ्यासाठी सर्वाधिक आठ कोटी ७५ लाख तरतुदीसह  समाजकल्याण, सार्वजनिक आरोग्य, कृषी, पाटबंधारे जलसंधारण  व महिला बालकल्याण अशा विविध विभागनिहाय तरतुदी मिळून  ६० कोटी ९९ लाख ५१ हजार खर्चाचा पालघर जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प शुक्रवारी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. 

जि.प. अध्यक्षा भारती कामडी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेचे अर्थ सभापती काशिनाथ चौधरी यांनी आगामी २०२१-२२ वर्षासाठी हा अर्थसंकल्प सादर केला. आगामी वर्षात ६३ कोटी ८० लाख ६४ हजार ४८५ इतक्या महसुली जमेमुळे आगामी वर्षात दोन कोटी ८१ लाख १३ हजार ४८५ इतकी शिल्लक अपेक्षित धरली आहे. 

पाणीपुरवठ्यासाठी सर्वाधिक ८ कोटी ७५ लाख, त्याखालोखाल समाजकल्याण चार कोटी ७७ लाख, सार्वजनिक आरोग्य चार कोटी ४१ लाख ५३ हजार, कृषी तीन कोटी २६ लाख एक हजार, पाटबंधारे जलसंधारण तीन कोटी ९६ लाख २५ हजार व महिला बालकल्याण दोन कोटी ६३ लाख २१ हजार अशा विविध विभागनिहाय तरतुदींसह ६० कोटी ९९ लाख ५१ हजार खर्चाचा पालघर जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प सर्वानुमते मंजूर करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सलिमाठ, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिनेश थोरात, नितीन ओगले व इतर अधिकारी उपस्थित होते.जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आरोग्यसेवेला अधिक बळकटी देण्यासाठी  विशेष अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे. शेती व्यवसायाला आधुनिकतेची जोड देत नवनवीन सुधारित कृषी अवजारे यांचा पुरवठा, कीड रोग नियंत्रण, ताडपत्रीपुरवठा इत्यादी योजना नव्याने अंतर्भूत करण्यात आल्या आहेत. दुग्ध व्यवसाय विषयाच्या अनुषंगाने महिला पशुपालकांना संकरित गायींची खरेदी व सुधारित जातीच्या म्हशीवाटप योजना राबविण्यात येणार आहेत.

अंगणवाड्यांना मिळणार स्वतःची इमारतबहुतांश अंगणवाडी केंद्रे भाड्याच्या खोलीत चालवली जात असल्याने त्यांना स्वतःची इमारत तयार करून देण्यावर भर देण्यात आला आहे. महिला व बालविकास विभागाच्या अनुषंगाने महिलांना कायदेशीर सल्ला देणे, सायकल पुरविणे, संगणक प्रशिक्षण देणे, अंगणवाडी केंद्र दुरुस्ती तसेच शासन निर्देशानुसार महिला व मुलींच्या विकासाच्या व आरोग्याच्या अनुषंगाने त्यांच्या प्रशिक्षणासाठी आवश्यक तरतूद करण्यात आली आहे.